बस व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल
By Admin | Updated: April 29, 2016 01:50 IST2016-04-29T01:50:19+5:302016-04-29T01:50:19+5:30
लग्न समारंभ तसेच शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांमुळे बसस्थानक व रेल्वे स्थानकावर एकच गर्दी दिसून येत आहे.

बस व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल
लग्नसराईची धूम : पिण्याच्या पाण्याची गैरसोय
रावणवाडी : लग्न समारंभ तसेच शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांमुळे बसस्थानक व रेल्वे स्थानकावर एकच गर्दी दिसून येत आहे. रेल्वे गाड्या, महामंडळाच्या व खासगी बसेस हाऊसफूल्ल भरुन जात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. तर काळीपिवळी आॅटोवाल्यांची चांदी झाली आहे.
मार्च एप्रिल महिन्यात बोर्डाच्या परीक्षा आटोपल्याने हजारो विद्यार्थी प्रवास करतात. तर बाल गोपालानांही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. तर अशातच लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू आहेत. त्यामुळे जाण्यायेण्याची मोठ्याने गर्दी वाढली आहे. परंतु बसेस व रेल्वे गाड्यांची कमतरता असल्याने क्षमतेच्यावर वाहनांमध्ये बसून प्रवास करीत आहेत. त्यामुळे अवैध वाहनांना एक संधीच मिळाली आहे.
गोंदिया मुख्य बसस्थानक व शहर बस स्थानकावर नेहमीच गर्दी असली तरी ऐन उन्हाळ्याच्या दिवसात प्रवासी मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करीत आहेत. असेच चित्र गोंदिया रेल्वे स्थानकावर दिसून येते. तिकीट काऊंटरवर एका एका खिडकीवर तीनतीन रांगा दिसून येत आहेत. पॅसेंजर व लोकल गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
फार मोठ्या गर्दीने रेल्वे स्थानकावर अनेक प्रकारचे अपघात होवून काहींना तर आपले प्राण गमवावे लागते. याची पर्वा न करता तोबा गर्दीत लहानसहान चिमुकल्या बच्चे कंपनीसोबत प्रवास करीत आहेत. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत आहे.
पण एसटी महामंडळ किंवा खासगी बसेसचे मालक प्रवाशांकरिता पिण्याच्या पाण्याचा तरी व्यवस्था करीत नाहीत. बहुतांश ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना विकतचे पाणी घेवून आपली तहान भागवावी लागत आहे. (वार्ताहर)