धानाचे पुंजणे जळून खाक
By Admin | Updated: October 21, 2015 01:54 IST2015-10-21T01:54:44+5:302015-10-21T01:54:44+5:30
तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील पोलीस पाटील विनोद ठाकूर यांच्या चार एकरातील धानाच्या पुंजण्याला आग लागल्याने ते जळून खाक झाले.

धानाचे पुंजणे जळून खाक
मोरवाही येथील घटना : शेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नुकसान
गोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील पोलीस पाटील विनोद ठाकूर यांच्या चार एकरातील धानाच्या पुंजण्याला आग लागल्याने ते जळून खाक झाले. सोमवारी दुपारी २ वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत ठाकूर यांचे एक लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले.
ठाकूर यांनी त्यांच्याकडील चार एकर शेतात १०१० या धानाची लागवड केली होती. कापणी केल्यावर शेतातच पुंजणे रचून ठेवले होते. मात्र सोमवारी (दि.१९) दुपारी २ वाजता अचानक धानाच्या पुंजण्याला आग लागली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच फायदा झाला नाही. परिणामी धानाचे पूंजणे जळून खाक झाले. तलाठी ममता ठकरेले व बीट रक्षक अशोक येळे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. यात १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी ठाकूर व नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)