तिरोड्यात सव्वा लाखाची घरफोडी

By Admin | Updated: June 24, 2016 00:11 IST2016-06-24T00:11:21+5:302016-06-24T00:11:21+5:30

स्थानिक सहकार नगरातील अलका रमेश मेने यांच्या घरी चोरट्यांनी समोरील दार तोडून घरातील सामानाची नासधूस केली ...

Burglar in the jeep | तिरोड्यात सव्वा लाखाची घरफोडी

तिरोड्यात सव्वा लाखाची घरफोडी

तिरोडा : स्थानिक सहकार नगरातील अलका रमेश मेने यांच्या घरी चोरट्यांनी समोरील दार तोडून घरातील सामानाची नासधूस केली व चार तोळे सोन्याचे दागिने व ७.८ हजार रुपये लंपास केले. एकंदरीत सव्वा लाखाचा माल लंपास केला.
१६ जूनपासून काही कामानिमित्त तसेच वडील मरण पावल्याने घरमालक सर्व कुटुंबियांसोबत नागपूरला होते. घरी कुणीच नसल्याने अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा उठवला.
गुरूवारी सकाळी या चोरीची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. चौकशी पंचनामा केला. डॉग स्कॉट व फिंगर प्रिंट घेण्यासाठी पोलीस पथक येवून चौकशी केली. अजूनपर्यंत ठोस सुगावा लागलेला नाही.
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्यादीच्या रिपोर्टवरुन गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास ए.पी.आय. उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Burglar in the jeep