अव्वल कारकुनाच्या खांद्यावर अप्पर तहसील कार्यालयाचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:57+5:302021-03-19T04:27:57+5:30
देवरी : तालुक्यातील लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ इत्यादी बाबींमुळे प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीने चिचगड येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय २१ ...

अव्वल कारकुनाच्या खांद्यावर अप्पर तहसील कार्यालयाचा भार
देवरी : तालुक्यातील लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ इत्यादी बाबींमुळे प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीने चिचगड येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय २१ फेब्रुवारी २०१९ ला सुुरू करण्यात आले. चिचगड हा भाग नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त व आदिवासी बहुल असून या क्षेत्रातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्रे वेळेवर मिळावे याच उद्देशाने तत्कालीन युती सरकारने अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी दिली होती. मात्र हे कार्यालय सध्या भगवान भरोसे सुरू असल्याचे चित्र आहे.
चिचगड अप्पर तहसील कार्यालयाकरिता अप्पर तहसीलदार १ पद मंजूर असून ते पद रिक्त आहे. नायब तहसीलदार १ पद मंजूर मात्र रिक्त, अव्वल कारकून १ पद मंजूर भरलेले, लिपिक-टकंलेखन ४ पद मंजूर असून सर्वच पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुध्दा प्रयत्न केले नाही. चिचगड अप्पर तहसील कार्यालयात दोन (२) मंडळे असून ककोडी गावाअंतर्गत १७ गावे तर चिचगड गावाअंतर्गत ३३ गावांचा समावेश करण्यात आला. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लोकानां सुरुवातीपासूनच त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयात अप्पर तहसीलदार म्हणून एन.जे. उइके यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांची बदली लाखांदूर येथे करण्यात आल्याने प्रभारी अप्पर तहसीलदार बी.टी. यावलकर असून ते देवरी येथील तहसील कार्यालयात कार्यरत आहे.
......