एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:13+5:30
या आरोग्य केंद्रात दररोज ओपीडीमध्ये तीनशे रुग्णांची गर्दी असते. अनेक रुग्ण रांगेत उभे राहून आपला नंबर कधी येणार याची वाट पाहत असतात. बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची दमछाक होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकदा औषधांचा साठा उपलब्ध राहत नसल्याने गोरगरीब रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावी लागते.

एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा भार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाºयाचे एक पद रिक्त आहे. हे पद अद्यापही भरण्यात आले नसल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरोश्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतंर्गत ३० खेडे गावांचा समावेश आहे. येथील अनेक कर्मचाऱ्यांची पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. महिनाभरापूर्वी आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र एका वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाली. त्यामुळे ते पद रिक्त आहे. परिणामी एकाच वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळत आहेत. मुंडीकोटा येथील लोकसंख्या साडेतीन हजारावर आहे. हे गाव या परिसरात केंद्राचे ठिकाण आहे. मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील ७ उपकेंद्राचा समावेश होतो.
या आरोग्य केंद्रात दररोज ओपीडीमध्ये तीनशे रुग्णांची गर्दी असते. अनेक रुग्ण रांगेत उभे राहून आपला नंबर कधी येणार याची वाट पाहत असतात. बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची दमछाक होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकदा औषधांचा साठा उपलब्ध राहत नसल्याने गोरगरीब रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावी लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका,ओपीडी आरोग्य सेविका,दोन आरोग्य सेवक, कंत्राटी औषधी निर्माण अधिकारी, एक सफाई कामगार आदी रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.