१२० खाटांच्या डीसीएचसी केंद्राचा भार आयुर्वेदिक व आयुष्यच्या डॉक्टरांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:10+5:302021-04-22T04:30:10+5:30
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर १२० खाटांच्या डीसीएचसीचे हस्तांतरण केटीएसकडून मेडिकलकडे १८ एप्रिल रोजी करण्यात आले ...

१२० खाटांच्या डीसीएचसी केंद्राचा भार आयुर्वेदिक व आयुष्यच्या डॉक्टरांवर
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर १२० खाटांच्या डीसीएचसीचे हस्तांतरण केटीएसकडून मेडिकलकडे १८ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करणे, या केंद्रात रुग्णांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सर्व जबाबदारी मेडिकलच्या व्यवस्थापनाची आहे. तसा स्पष्ट उल्लेखही या डीसीएचसी केंद्राचे हस्तांतरण करताना पत्रात केला आहे. मात्र, यानंतरही याचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. डीसीएचसी केंद्रामध्ये सद्य:स्थितीत शंभरावर रुग्ण दाखल आहेत. येथे कोविड गंभीर रुग्ण दाखल राहत असल्याने या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्याची गरज आहे. मात्र, काम करण्यास तयार नसल्याने सर्व धुरा आयुष्य, आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथी डॉक़्टरांवर सोपविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे हे सर्व डॉक़्टर तणावाखाली आले आहे. इंटर्नशिप करणारे एमबीबीएस डॉक्टरांचीसुद्धा या ठिकाणी ड्युटी लावण्यात आली नाहे. त्यामुळे इंटर्नशिप करणारे एमबीबीएस डॉक्टर नेमके गेले कुठे प्रश्नसुद्धा कायम आहे. यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे तक्रारसुद्धा करण्यात आली; पण त्यांनी याची कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे आयुष्य, आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथी डॉक़्टर डीसीएचसी केंद्रामधील कोविड रुग्णांवर रात्रंदिवस उपचार करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.