देवरीत फुटपाथवर चालला बुलडोझर
By Admin | Updated: December 18, 2015 02:21 IST2015-12-18T02:21:32+5:302015-12-18T02:21:32+5:30
शहरातील गोंड विरांगणा चौकाला लागून असलेल्या चिचगड मार्गावरील दोन्ही बाजूला फृुटपाथवर असलेले अतिक्रमण ...

देवरीत फुटपाथवर चालला बुलडोझर
सा.बां. विभागाची धडक कारवाई : गोंड विरांगणा चौक ते चिचगड मार्गावरील दुकाने हटविली
देवरी : शहरातील गोंड विरांगणा चौकाला लागून असलेल्या चिचगड मार्गावरील दोन्ही बाजूला फृुटपाथवर असलेले अतिक्रमण गुरुवारी (दि.१७) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महसूल विभाग, नगर पंचायत व पोलीस विभागाच्या सहकार्याने हटविले.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या या मार्गाच्या व गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला अतिक्रमण वाढले होते. अतिक्रमणामुळे मुख्य रस्तासुद्धा बोळीसारखा झाला होता. ग्रामीण रुग्णालयात जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात होता. प्रशासनाने वारंवार सूचना देवूनसुद्धा अतिक्रमण ‘जैसे थे’होते.
गुरुवारला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांची मदत घेवून रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. (प्रतिनिधी)