समता काॅलनीचा रस्ता तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST2021-02-11T04:31:20+5:302021-02-11T04:31:20+5:30

अर्जुनी मोरगाव : येथील प्रभाग क्रमांक ९, समता काॅलनीमध्ये तयार करण्यात आलेला रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, नावाचेच ...

Build the road to equality | समता काॅलनीचा रस्ता तयार करा

समता काॅलनीचा रस्ता तयार करा

अर्जुनी मोरगाव : येथील प्रभाग क्रमांक ९, समता काॅलनीमध्ये तयार करण्यात आलेला रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, नावाचेच डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.

हा रस्ता सिव्हिल लाइन, ताडगाव मार्गावरून विश्वशांती बुद्धविहाराकडे जाणारा आहे. तिथूनच समोरही जाणारा आहे, या भागात सुशिक्षित व नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो.

या भागातील नाल्या केरकचऱ्याने तुंबल्या असून, सांडपाण्याचा निचरा योग्य होत नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

.....

आम्ही अनेक वर्षांपासून या परिसरात राहतो. या रस्त्यावरची गिट्टी उखडून गेल्याने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. मात्र, अद्यापही याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे.

-विजय गोंडाणे, सेवानिवृत्त शिक्षक, समता काॅलनी

Web Title: Build the road to equality