बीएसएनएल कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:11 IST2019-02-18T22:11:01+5:302019-02-18T22:11:20+5:30
भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) मधील सर्वच कर्मचारी संपावर गेले असून सोमवारपासून (दि.१८) पुढील ३ दिवसांचा हा देशव्यापी संप राहणार आहे. यामुळे संपाच्या या तीन दिवसांत बीएसएनएलचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती आहे.

बीएसएनएल कर्मचारी संपावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) मधील सर्वच कर्मचारी संपावर गेले असून सोमवारपासून (दि.१८) पुढील ३ दिवसांचा हा देशव्यापी संप राहणार आहे. यामुळे संपाच्या या तीन दिवसांत बीएसएनएलचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती आहे.
आॅल इंडिया कर्मचारी संयुक्त मोर्चाच्यावतीने सोमवारपासून (दि.१८) बुधवारपर्यंत (दि.२०) ३ दिवसांचा हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. संचार मंत्र्यांनी दिलेल्या वेतनवाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, ४-जी स्पेक्ट्रम देण्याचे आश्वासन दिले मात्र त्याची पूर्तता न केल्यामुळे बीएसएनएल ४-जी सेवा देऊ शकत नाही. करिता ४-जी स्पेक्ट्रम देण्यात यावे, कर्ज घेण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, इलेक्ट्रीक बील भरण्यासाठी निधी देण्यात यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, खासगी कंपन्यांना पुढे करण्यासाठी बीएसएनएलची फिक्सींग केली जात असल्याचेही क र्मचारी बोलत आहेत. या देशव्यापी संपामुळे मात्र बीएसएनएलचे संपूर्ण कामकाज पुढील ३ दिवस ठप्प राहणार आहे.
संपांतर्गत कर्मचाऱ्यांनी शहरातील सुभाष बागेच्या शेजारी असलेल्या कार्यालयात ठिय्या देत नारेबाजी करून सरकारचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी विलास बांते, आर.डी.तेलंग, आर.वाय.भांडारकर, प्रदीप ठवरे, एम.एफ.बिसेन, पी.के.मरसकोल्हे, पी.के. माहुले, जे.के.रामटेके, एफ.जी. फुंडे, आर.डी. यादव, मानकर, शालीकराम भेलावे, एम.आर.बनोटे, रज्जू खान, मधू हरपाल, जे.के. मकवाना, के.बी.गोरखे, जी.डी. विंचूरकर, बी.जी.टेंभरे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत
बीेएसएनएल कर्मचाºयांचे आंदोलन सुरू असतानाच इंटरनेट केबल तुटल्याने शहरातील इंटरनेट सेवा बंद पडली होती. मात्र कर्मचारी केबलची दुरूस्ती करणार असल्याची माहिती होती. मात्र अवघा दिवस इंटरनेट बंद असल्याने सर्वच व्यवहार विस्कळीत झाले होते. त्यात ३ दिवसांचा संप असल्याने व यामधात इंटरनेट सेवा सुरू न झाल्यास नागरिकांची मात्र चांगलीच फसगत होणार यात शंका नाही.