बहिणीच्या लग्नाच्या धामधुमीत भावाचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: April 5, 2015 01:21 IST2015-04-05T01:21:13+5:302015-04-05T01:21:13+5:30
बहिणीच्या लग्नासाठी तयारी म्हणून गोंदियातून साहित्य खरेदी करून गावाला परतणाऱ्या भावाच्या दुचाकीला बोलेरोने धडक दिल्याने नवऱ्या मुलीच्या भावाचा मृत्यू झाला.

बहिणीच्या लग्नाच्या धामधुमीत भावाचा अपघाती मृत्यू
गोंदिया : बहिणीच्या लग्नासाठी तयारी म्हणून गोंदियातून साहित्य खरेदी करून गावाला परतणाऱ्या भावाच्या दुचाकीला बोलेरोने धडक दिल्याने नवऱ्या मुलीच्या भावाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारच्या साकाळी ९.३० वाजता दरम्यान कुडवाच्या अशोका बिअरबार समोर घडली. योगेश मेघनाथ पटले (२३) रा. हुडकाटोला असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याच्या बहिणीचे शनिवारी लग्न असल्याने साहित्य खरेदी करण्यासाठी तो सकाळीच मोटारसायकलने गोंदियाला आला होता. साहित्य खरेदी करून जात असताना त्याच्या दुचाकीला बालेरो एमएच ३१ सी आर ६८४० च्या चालकाने धडक दिली. बोलेरोचा समोरचा चाक फाटल्याने वाहनाचे संतुलन बिघडले. यात त्याच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या योगेशला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता उपचार घेतांना सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाला. वाहन चालक प्रकाश चौधरी (२६) रा. उसर्रा ता. मोहाडी याच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.