कुऱ्हाडीने घाव घालून भावाने केला भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:00 AM2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:14+5:30

६ डिसेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता सुंदरनगर परिसरातील राधाकृष्ण वॉर्डातील सरकारी तलावाच्या बाजूला असलेल्या रेल्वे मैदानावरील पिंपळाच्या झाडाखाली बारीकराव वाघाडे बसले होते. यावेळी आरोपी गुणाराम सिताराम वाघाडे (४५) हा कुऱ्हाडी घेवून मागून आला व बारीकराव यांच्यावर कुऱ्हाडीने तीन घाव घातले. रक्तबंबाळ बारीकरावला उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.

The brother kills his brother by ax | कुऱ्हाडीने घाव घालून भावाने केला भावाचा खून

कुऱ्हाडीने घाव घालून भावाने केला भावाचा खून

Next
ठळक मुद्देतीन दिवस मृत्यूशी झुंज: आरोपीला गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वारंवार होत असलेल्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. यात गंभीर जखमी झालेल्या थोरल्या भावाने तीन दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर सोमवारी (दि.९) सकाळी उपचारादरम्यान नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्याचा मृत्यू झाला. बारीकराव सीताराम वाघाडे (५०,रा. सुंदरनगर) असे मृताचे नाव आहे.
६ डिसेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता सुंदरनगर परिसरातील राधाकृष्ण वॉर्डातील सरकारी तलावाच्या बाजूला असलेल्या रेल्वे मैदानावरील पिंपळाच्या झाडाखाली बारीकराव वाघाडे बसले होते. यावेळी आरोपी गुणाराम सिताराम वाघाडे (४५) हा कुऱ्हाडी घेवून मागून आला व बारीकराव यांच्यावर कुऱ्हाडीने तीन घाव घातले. रक्तबंबाळ बारीकरावला उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून उपचारासाठी नागपूरला रवाना केले.
आरोपी गुणाराम मद्याच्या धुंदित होता व मला मारल्यामुळे मी बदला घेतला असे तो आपल्या पत्नीला म्हणत होता. त्याची पत्नी प्रमिला गुणाराम वाघाडे (३२) यांनी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, नितीन सावंत, पोलीस कर्मचारी राजू मिश्रा, जागेश्वर उईके, छगन विठ्ठले, तुलसीदास लुटे, निरज भगत, वेदक, चकोले, प्रकाश गायधने, सुबोध बिसेन, महेश मेहर, विनोद शहारे यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला पोलीस ठाण्यात आणले. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना सोमवारी (दि.९) सकाळी बरीकराव यांचा मृत्यू झाला. गोंदिया शहर पोलिसांनी सुरूवातीला आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला १२ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता बारीकरावचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यातील कलमात वाढ होणार आहे. सदर आरोपीची पोलीस कोठडीही वाढणार आहे.

Web Title: The brother kills his brother by ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून