राज्यातील सर्व नृत्य कलाकारांना एका छत्राखाली आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:51+5:302021-02-08T04:25:51+5:30
केशोरी : ग्रामीण भागातील कलावंतांना वाव देणे आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना चालना मिळवून देणे, नृत्य परिषदेच्या सर्व सदस्यांना ...

राज्यातील सर्व नृत्य कलाकारांना एका छत्राखाली आणणार
केशोरी : ग्रामीण भागातील कलावंतांना वाव देणे आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना चालना मिळवून देणे, नृत्य परिषदेच्या सर्व सदस्यांना शासकीय योजनेचा लाभ आणि निवृत्तीवेतन मिळवून देणे,प्रत्येक शाळांमध्ये ४०० विद्यार्थ्यांमागे एका नृत्यशिक्षकाची नेमणूक करणे, वर्ग संचालक व नृत्य दिग्दर्शक यांसाठी अभ्यासक्रम शिबीर, कलावंतांना सवलतीचे शासकीय निवासस्थान मिळवून देणे विद्यापीठीय अभ्यासक्रमातून लोकनृत्य आणि पाश्चात्य नृत्याचा मान्यताप्राप्त विद्यापीठांतर्गत नृत्याचे प्रशिक्षण वर्ग नियमित चालविण्याचे कार्य सदोदित महाराष्ट्र नृत्य परिषदेच्या मार्फत राबविली जात असल्याचे गोंदिया शाखा अध्यक्ष संजू वलथरे यांनी सांगितले.
प्रत्येक कलाकारांना विमा मिळवून देणे, जिल्हानिहाय नृत्यगृह निर्माण करणे आणि नव्या कलाकारांना कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे व कलाकारांच्या अडचणी सोडविणे इत्यादी कामे केली जातात. या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रख्यात नृत्य गुरु मनिषा साठे असून मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघ राजेभोसले,चित्रपट अभिनेत्री मधू कांबीकर कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. नृत्य परिषद महाराष्ट्र शाखा गोंदियातर्फे अर्जुनी मोरगाव येथील किंग डान्स अकॅडमी येथे झालेल्या बैठकीत अर्जुनी मोरगाव तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्षपदी सर्वानुमते यश गाढवे यांची निवड करण्यात आली. तालुका सहकार्यपदी सुमित सोनवाने, जिल्हा उपाध्यक्षपदी विष्णू चाचेरे, जिल्हा कार्यक्रम नियोजन प्रमुख दिप्रसन मंडल, जिल्हा युवती प्रमुख प्रेमलता उपरीकर, सहयुवती प्रमुख खेमू तिरगम ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कृष्णा टिचकुले , जिल्हा कार्यालयीन व्यवस्था प्रमुख योगेश बडोले यांची निवड करण्यात आली.