सीतेपार नाल्यावरील पूल जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:29+5:30

सितेपार पुलावरुन किसनपूर, शिकारीटोला नागरिक आणि विद्यार्थी दररोज ये-जा करतात. तर या पुलावरुन वाहनांची सुध्दा वर्दळ असते. मात्र हा पूल जीर्ण झाला असून काही भाग खचत चालला आहे. त्यामुळे हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी सितेपार ते किरनापूर या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत करण्यात आले.

The bridge over the Sitapar river drains | सीतेपार नाल्यावरील पूल जीर्ण

सीतेपार नाल्यावरील पूल जीर्ण

ठळक मुद्दे११ वर्षांतच पुलाची दुरवस्था । सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार येथील पुलाचे बांधकाम सन २००७-०८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत २२ लाख रुपये खर्चून करण्यात आले. संबंधित कंत्राटदराने पुलाच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केल्याने अल्पावधीतच हा पूल र्जीण झाला आहे. त्यामुळे केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सितेपार पुलावरुन किसनपूर, शिकारीटोला नागरिक आणि विद्यार्थी दररोज ये-जा करतात. तर या पुलावरुन वाहनांची सुध्दा वर्दळ असते. मात्र हा पूल जीर्ण झाला असून काही भाग खचत चालला आहे. त्यामुळे हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी सितेपार ते किरनापूर या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत करण्यात आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांने या पुलाची पाहणी सुध्दा केली नाही.त्यामुळे पावसाळ्यात या पुलाचा काही भाग खचला आहे. आठ दिवसांपूर्वीच या पुलाची पाहणी माजी मंत्री आ.राजकुमार बडोले यांनी पाहणी केली होती.अभियंत्यांना पुलाची लवकर दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अभियंत्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे पुलाची समस्या कायम आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून हा पूल खचून मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The bridge over the Sitapar river drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.