घटेगाव मार्गावरील पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:15+5:30
ग्राम घटेगाव येथील पूल सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत तयार करण्यात आला. मात्र पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने पुलाचा काही भाग खचत आहे. साकोली, हेटी, गिरोला आणि परिसरातील अन्य गावांकडे जाण्याकरिता याच पुलाचा सर्वाधिक उपयोग होतो. त्यामुळे या पुलावरुन दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

घटेगाव मार्गावरील पूल धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम घटेगाव मार्गावर असलेल्या नाल्यावरील पूल जीर्ण झाला असून तो कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
ग्राम घटेगाव येथील पूल सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत तयार करण्यात आला. मात्र पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने पुलाचा काही भाग खचत आहे. साकोली, हेटी, गिरोला आणि परिसरातील अन्य गावांकडे जाण्याकरिता याच पुलाचा सर्वाधिक उपयोग होतो. त्यामुळे या पुलावरुन दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पुलावरील खड्यांमुळे अपघाताच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. तर पुलाचा काही भाग खचत असल्याने केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जि.प.सदस्य शिला चव्हाण यांनी माजी पालकमंत्री आणि विद्यमान पालकमंत्री यांना निवेदन देऊन या पुलाच्या दुरूस्तीची मागणी केली होती. परंतु अद्यापही या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे पुलाची समस्या कायम आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पूल खचण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.