लाचखोर सरपंचासह दोघांना पकडले
By Admin | Updated: July 17, 2015 01:10 IST2015-07-17T01:10:56+5:302015-07-17T01:10:56+5:30
शौचालय बांधकामासाठी असलेल्या धनादेशवर सही करण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच मागून ती एका व्यक्तीच्या मार्फत स्वीकारताना...

लाचखोर सरपंचासह दोघांना पकडले
तीन हजार रूपयांची लाच : दोघांना जामीन फेटाळला
गोंदिया : शौचालय बांधकामासाठी असलेल्या धनादेशवर सही करण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच मागून ती एका व्यक्तीच्या मार्फत स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरपंच महिलेला रंगेहात पक डले. बुधवारी (दि.१५) सायंकाळी तिरोडा येथील बाजार चौकातील ग्यानचंदानी कॉम्लेक्स येथे ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर असे की, तक्रारदार यांच्या नावाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपयांचा धनादेश सालेबर्डी ग्राम पंचायत येथे तयार होता. मात्र त्यावर सही करण्यासाठी सरपंच चंदनलाल मंगला राहुल (४२,रा.सालेबर्डी) हिने तक्रारदारांकडे तीन हजार रूपयांची मागणी केली. यावर मात्र तक्रारदाराने १४ जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१५) सायंकाळी तिरोडा येथील बाजार चौक स्थित ग्यानचंदानी कॉम्लेक्समध्ये सापळा लावला. येथे सरपंच मगला राहुल हिने दिनदयास रामदास अनकर (४०,रा.धादरी) या इसमाच्या मार्फत मागणी केलेली तीन हजार रूपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. तर लाचेची रक्कम अनकरकडून जप्त करण्यात आली. दोघांवर तिरोडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १२, १३(१)(ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोघांना न्यायालयाने जामीन फेटाळला असून त्यांना भंडारा कारागृहात रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)