नोकरीच्या नावावर तरुणाला आठ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST2021-09-24T04:34:17+5:302021-09-24T04:34:17+5:30
गोंदिया : रेल्वेत टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष देत तरुणाकडून तब्बल आठ लाख रुपये उकळण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले ...

नोकरीच्या नावावर तरुणाला आठ लाखांचा गंडा
गोंदिया : रेल्वेत टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष देत तरुणाकडून तब्बल आठ लाख रुपये उकळण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. १० डिसेंबर २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२० दरम्यान घडलेल्या या प्रकरणात आरोपींनी तरुणाला बनावट नियुक्तिपत्रही दिले होते.
फिर्यादी मयूर बंडुलाल दाते (२२,रा.कुडवा) या तरुणाला आरोपींनी रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले. यासाठी आरोपींनी मयूरकडून मामा चौकात रोख व धनादेशाद्वारे एकूण आठ लाख रुपये घेतले. एवढेच नव्हे तर त्याला टीसीचे बनावट ओळखपत्र, ईस्टन रेल्वे भारत सरकारचे असिस्टंट सेक्रेटरी रेल्वे रक्रिुटमेंट बोर्ड इस्टन रेल्वे कोलकाता यांचे सही व शिक्का असलेले टीसी पदाचे नियुक्तिपत्र, मेडिकल सर्टिफिकेट, रेसिडेंशियल कोरा पॉर्म व बोटाच्या ठशांचा फॉर्म अशी सही-सिक्क्यांची बनावट कागदपत्रे तयार करून दिली. प्रकरणी शहर पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४७१ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.