मालगाडीचे डबे फोडून साखरेच्या पोत्यांची चोरी १४ पोती हस्तगत
By Admin | Updated: May 8, 2014 02:17 IST2014-05-08T01:45:06+5:302014-05-08T02:17:29+5:30
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे स्थानक परिसरात उभ्या मालगाडीला लक्ष्य करून येथील स्थानकावर चोरट्यांनी मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून साखरेची पोती लंपास केली होती.

मालगाडीचे डबे फोडून साखरेच्या पोत्यांची चोरी १४ पोती हस्तगत
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील प्रकार आमगाव :
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे स्थानक परिसरात उभ्या मालगाडीला लक्ष्य करून येथील स्थानकावर चोरट्यांनी मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून साखरेची पोती लंपास केली होती. या प्रकरणात आता दुसर्या आरोपीला आमगाव पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे प्रशासनाने व्यवसायीकरणाला पुढाकार घेत रेल्वेतून खासगी माल वाहतूक प्रारंभ केली. या रेल्वेमार्गाअंतर्गत दररोज कोट्यवधीची मालवाहतूक करण्यात येत आहे. परंतु सध्या रेल्वे सुरक्षा दावणीला बांधून चोरांनी रेल्वे दळवळण मार्गावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यातूनच रेल्वे मार्गावर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई-हावडा मार्गावर आमगाव स्थानकात २१ एप्रिल रोजी रेल्वे स्थानकावर उभी असलेली मालगाडी चोरांनी टार्गेट करुन रात्री मालगाडीच्या डब्यांना फोडून त्यात असलेल्या साखरेच्या पोत्यांवर हात साफ केला.
या चोरांच्या टोळीकडे रेल्वे कर्मचार्यांनी पांघरून घातल्याने चोरांनी मोठ्या प्रमाणात साखरेच्या पोत्यांची चोरी केली. सदर रेल्वेतून चोरलेल्या पोत्यांची विक्री करताना दुसर्या दिवशी आमगाव पोलिसांनी आरोपी धमेंद्र उर्फ कोल्ह्या रामचंद्र मेश्राम याला अटक केली होती. त्याच्याकडून सात पोती साखर हस्तगत करुन पोलिसांनी भादंवि कलम ४ (१) ड अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. यात तपासात ६ मेला आरोपी प्रकाश ऊर्फ कवळ्या बुधराम बावनेकर रा. रिसामा वॉर्ड क्र. १, वय २४ वर्ष याला अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेली सात पोती साखर पोलिसांनी हस्तगत करुन मुंबई पोलीस कायदा १२४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. सदर प्रकरणात अनेक आरोपी असून त्यांनी मालगाडीच्या डब्यातून ४० पोतींच्या वर साखरेची चोरी केल्याची माहिती पुढे येत आहे. एवढ्या प्रमाणात साखरेची पोती चोरणार्यांमध्ये अनेक आरोपींचा शोध पोलीस घेणार काय, असा प्रश्न पुढे आहे. दरम्यान मुंबई हावडा मार्गावर रेल्वे स्थानकातून चोरांनी मोठ्या प्रमाणात मालगाडीचे डबे फोडून साखरेची पोती चोरली असली तरी या प्रकरणात रेल्वे सुरक्षा विभाग अजूनही अनभिज्ञ आहे. (शहर प्रतिनिधी)