शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे पॉवर केबल तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 20:52 IST

तिरोडा रेल्वे मार्गावर काचेवानी रेल्वे स्थानकाच्या यार्डात रेल्वेचा वीज तार (पॉवर केबल) तुटल्यामुळे रविवारी (दि.११) अनेक गाड्या प्रभावित झाल्या.

ठळक मुद्देसर्व मेमू गाड्या रद्द : तीन तास उशिरा सुटली महाराष्ट्र एक्स्प्रेस

ऑनलाईन लोकमतगोंदिया : तिरोडा रेल्वे मार्गावर काचेवानी रेल्वे स्थानकाच्या यार्डात रेल्वेचा वीज तार (पॉवर केबल) तुटल्यामुळे रविवारी (दि.११) अनेक गाड्या प्रभावित झाल्या. तर अनेक गाड्यांचा प्रवास रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे, महाराष्ट्र एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशिरा सोडण्यात आली.काचेवानी रेल्वे स्थानकाजवळ पावर केबल तुटले. रेल्वेगाड्यांच्या योग्यरित्या परिचालनासाठी वीज तारांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते. तार तुटल्याची घटना रविवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. त्यामुळे गाडी क्रमांक ६८७१३, ६८७१४, ६८७४३, ६८७४४ (सर्व मेमू गाड्या) व ट्रेन क्रमांक ५८८१६ रद्द करण्यात आल्या आहेत.गोंदिया ते कोल्हापूरदरम्यान धावणारी महाराष्टÑ एक्स्प्रेसची गोंदिया रेल्वे स्थानकातून सुटण्याची वेळ सकाळी ८.२० वाजताची आहे. परंतु ही गाडी ११.४० वाजता गोंदियातून सोडण्यात आली.वीज तार तुटल्यानंतर गोंदिया शहरात पसरलेल्या चर्चेनुसार, शालिमार एक्स्प्रेस जेव्हा गंगाझरी स्थानकात पोहोचली त्यावेळी तार तुटल्याची घटना घडली. परंतु शालिमार एक्स्प्रेस गेल्यानंतर तार तुटल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावितदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत दाधापारा-उरकुरा सेक्शनदरम्यान ११, १८ व २५ मार्च तसेच १, ८, १५, २२ व २९ एप्रिल रोजी(प्रत्येक रविवारी) अप लाईन, मिडल लाईन व डाऊन लाईनवर बहुविभागीय आवश्यक कामांसाठी इंटिग्रेटेड कोरिडोर ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे सदर दिवशी काही प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे. यात ११, १८ व २५ मार्च तसेच १, १५, २२, २५ व २९ एप्रिल रोजी धावणारी (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर बिलासपूर-रायपूर-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. २५ मार्च व १, ८, २२ व २९ एप्रिल रोजी (५८२०५) रायपूर-ईतवारी पॅसेंजर रद्द राहील. तसेच दुसºया दिवशी सोमवारी (५८२०६) इतवारी-रायपूर पॅसेंजर रद्द राहील. याशिवाय १८ व २५ मार्च आणि १, ८, १५, २२ व २९ एप्रिल रोजी (१८२३८) अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेसला रायपूर-बिलासपूर दरम्यान पॅसेंजर बनवून चालविण्यात येणार आहे.गंतव्य स्थळापूर्वीच समाप्त होणाऱ्या गाड्यादपूम रेल्वेच्या बिलासपूर रेल्वे मंडळांतर्गत बिलासपूर-रायगड रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कार्यासाठी १७, १८, २४, २५ व ३१ मार्च तसेच १ एप्रिल या सात दिवसांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रवासी गाड्यांचा प्रवास प्रभावित होणार आहे.यात (५८११७) झारसुगडा-गोंदिया पॅसेंजर १७, २४ व ३१ मार्चला झारसुगडा-बिलासपूर-झारसुगडा दरम्यान प्रत्येक शनिवारी रद्द राहील. तसेच १८, २५ मार्च व १ एप्रिलला प्रत्येक रविवारी झारसुगडा-रायपूर-झारसुगडा दरम्यान रद्द राहील. तसेच (५८११८) गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर १७, २४ व ३१ मार्चला शनिवारी बिलासपूरमध्येच समाप्त करून या गाडीला बिलासपूरवरून (५८११७) झारसुगडा-गोंदिया पॅसेंजर बनवून गोंदियासाठी रवाना करण्यात येईल. १८, २५ मार्च व १ एप्रिल रोजी बिलासपूरमध्येच समाप्त करून या गाडीला बिलासपूरवरून (५८११७) झारसुगडा-गोंदिया पॅसेंजर बनवून गोंदियासाठी रवाना करण्यात येईल.रेल्वे प्रवाशांच्या सुविधांना लक्षात ठेवून रेल्वे प्रशासनाद्वारे (१२८३४) हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसला झारसुगडा व रायगड दरम्यान प्रत्येक शनिवारी व रविवारी १७, १८, २४, २५, ३१ मार्च व १ एप्रिल रोजी पॅसेंजर बनवून चालविण्यात येईल.