काचेवानी रेल्वे गेट तोडून ट्रक पसार

By Admin | Updated: March 1, 2015 01:03 IST2015-03-01T01:03:58+5:302015-03-01T01:03:58+5:30

भरधाव वेगात असलेला एक ट्रक येथील रेल्वे क्रॉसिंगचे गेट तोडून पसार झाला.

Break the Kachewani railway gate and transport the truck | काचेवानी रेल्वे गेट तोडून ट्रक पसार

काचेवानी रेल्वे गेट तोडून ट्रक पसार

काचेवानी : भरधाव वेगात असलेला एक ट्रक येथील रेल्वे क्रॉसिंगचे गेट तोडून पसार झाला. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. विशेष म्हणजे या रेल्वे क्रॉसींगचे गेट बंद असल्यास येथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग लागलेली असते. मात्र घटना घडली त्यावेळी गेट उघडे होते. त्यामुळे थोडक्यात मोठा अपघात टळला.
तिरोडा मार्गावर अदानी पॉवर प्लांटपासून काही अंतरावर काचेवावी रेल्वे कॉ्रसींग आहे. या मार्गावरून कोणतीही रेल्वे गाडी जात असताना हे क्रॉसींगवरील गेट पाडले जातात. शनिवारी (दि.२८) दुपारी २.३० वाजता दरम्यान हे गेट उघडे असताना भरधाव वेगात असलेला ट्रक क्रमांक एमएच २७- ए ९२२३ ने रेल्वे गेट तोडून पसार झाला. तर गेट तुटताच त्यांचे एक टोक रेल्वेच्या पावर लाईनवर आदळून खाली पडले.
यामध्ये पावर लाईन तुटल्याचे वाटले. मात्र तसे झाले नसून रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर काही प्रभाव पडला नाही.
विशेष म्हणजे, येथे एक मोठी घटना टळली. तर घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलीसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तर रेल्वे प्रशासनाने व्यवस्था हाती घेतली. वृत्त लिहेपर्यंत गेटच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच येथे अपघाताची शक्यता बघता वैकल्पीक व्यवस्था करण्यात आली. तिरोडा पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी हे प्रकरण गोंदिया रेल्वे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचे सांगीतले. तर गोंदिया रेल्वे पोलिसांनी प्रकरणाची नोंद नसल्याचे सांगीतले. मात्र पसार झालेल्या ट्रकला परत गेटवर आणले होते. तर ट्रक चालक दारूच्या नशेत असून त्यातूनच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Break the Kachewani railway gate and transport the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.