नाटकाच्या आयोजनाला लागणार ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:54 IST2018-11-11T21:53:40+5:302018-11-11T21:54:22+5:30
दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. मंडईच्या निमित्ताने रात्रीला नाटक, दंडार, तमाशा, ड्रामा, आर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम रात्रभर सुरु असतात.

नाटकाच्या आयोजनाला लागणार ‘ब्रेक’
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. मंडईच्या निमित्ताने रात्रीला नाटक, दंडार, तमाशा, ड्रामा, आर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम रात्रभर सुरु असतात. रात्री १०.३० वाजतानंतर कार्यक्रम बेकायदेशीरपणे सुरु ठेवणाऱ्या कलाकार व आयोजक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मोहीम पोलीस विभागाने सुरु केली आहे.
पूर्व विदर्भात दिवाळीनंतर गावा-गावात मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने रात्रीच्यावेळी लोकांमध्ये जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता मंडईची धूम सुरु होणार असल्याने गावागावातील तरुण या मंडईनिमित्त नाटक व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आखणी करतात. असे कार्यक्रम करणाºया मंडळावर व त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मोहीम जिल्हा पोलिसांनी सुरु केली आहे. अशा प्रकारच्या दोन कारवाया गोरगाव तालुक्याच्या कटंगी येथे करण्यात आल्या. कटंगी येथे शारदा नवयुवक नाट्य मंडळ कटंगी बुज तर्फे ९ नोव्हेंबरला ‘केव्हा येणार कुंकवाचा धनी’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजकांनी तहसीलदार यांची रितसर परवानगी घेतली होती. परंतु त्या परवानगीत दिलेल्या अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे तेजेंद्र हरिणखेडे, मिलींद भाऊराव शहारे, ज्ञानेश्वर हरिणखेडे, दिनेश हरिणखेडे, हसीनलाल बघेले, सुरेश हरिणखेडे, प्रदीप हरिणखेडे, नरेंद्र पटले, हितेंद्र भगत, सोनू रहांगडाले, तुरेश रहांगडाले, दिलराज सिंगाडे, नूलचंद रहांगडाले, देवेंद्र हरिणखेडे, डॉ. विजय बघेले, उमेश अगरे,जगन भोयर, किसनलाल बिसेन, रोहीत हरिणखेडे, मुकेश बघेले, रविंद्र पटले, जितू रहांगडाले, ओमेश्वर रहांगडाले, राजेंद्र पटले, मिलींद शहारे, रुपचंद बोपचे, परमेश्वर पंधराम, अमोल सखाराम पानसे रा. नागभिड व त्यांच्या सहकलाकावर गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, १४३, सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कटंगी येथे याच दिवशी शारदा बाल गणेश मंडळ कटंगीतर्फे आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. रात्री १० नंतर हे कार्यक्रम सुरुच होते. परवानगी घेताना लिहून दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केल्यामुळे रेखलाल टेंभरे, डॉ. योगेश हरिणखेडे, लालचंद टेंभरे, युगेश खरवडे, निलेश गट्टू गजघाटे, सुनील सोनवाने, संजय डोमळे, नरेंद्र दिहारी, अमीन अगवान, संदीप हरिणखेडे, अभय रहांगडाले, माणिकचंद रहांगडाले, रंजित हरिणखेडे, चंद्रशेखर रहांगडाले, खेमराज सोनवाने, प्रशांत शहारे, विनोद चौधरी, शुभम रहांगडाले, गजानन चोपकर, निलेश्वर चौरागडे, ओ.सी.शहारे, लिखीराम येळे, लालचंद चैतराम चव्हाण, जगदिश दर्यावसिंह पटले व त्याच्या सहकलाकांरावर भादंवीच्या कलम १८८, १४३, सहकलम १३५मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.