कलपाथरी व पालेवाड्याच्या नागरिकांचा बहिष्कार
By Admin | Updated: October 15, 2014 23:20 IST2014-10-15T23:20:06+5:302014-10-15T23:20:06+5:30
अर्जुनी मोरगाव मतदार संघात परंतू गोरेगाव तालुक्यात येणाऱ्या कलपाथरी व पालेवाडा या गावातील नागरिकांनी सिंचनाची सोय होत नसल्याचे सांगत मतदानावर बहिष्कार टाकला. कलपाथरी मध्यम

कलपाथरी व पालेवाड्याच्या नागरिकांचा बहिष्कार
गोरेगाव : अर्जुनी मोरगाव मतदार संघात परंतू गोरेगाव तालुक्यात येणाऱ्या कलपाथरी व पालेवाडा या गावातील नागरिकांनी सिंचनाची सोय होत नसल्याचे सांगत मतदानावर बहिष्कार टाकला. कलपाथरी मध्यम प्रकल्प, कटंगी प्रकल्प व चुलबंद धरण या भागात आहे. पालेवाडा कलपाथरीपासून ५ किमी अंतरावर असूनही तेथे सिंचनाची सोय नाही. शासनाला वारंवार सूचना देवूनही शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पालेवाडा बुथ क्र. १२ व कलपाथरी बुथ क्र.२६ या केंद्रांवर १०० टक्के बहिष्कार टाकला. मतदानावर बहिष्कार टाकू नये यासाठी तहसीलदार डी.ए.सपाटे, पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी मतदारांची समजूत काढण्यासाठी वारंवार चर्चा करून मन वळविण्याचे अयशस्वी प्रयत्न केले.