कंत्राटदारांचा निविदांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:11 IST2017-09-01T01:11:26+5:302017-09-01T01:11:40+5:30
सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या प्रांगणात कंत्राटदार उदयकुमार प्रमर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांची विशेष सभा घेण्यात आली.

कंत्राटदारांचा निविदांवर बहिष्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या प्रांगणात कंत्राटदार उदयकुमार प्रमर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांची विशेष सभा घेण्यात आली. केंद्र शासनाद्वारे १८ टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) सर्व नवीन व जुन्या चालू कामांवर लावण्यात आले., याचा विरोध करून सर्व कंत्राटदारांनी सर्वच विभागांच्या निविदा (टेंडर) न भरण्याचा निर्णय या वेळी घेतला.
यासाठी सदर बैठकीत सर्व तालुका स्तराच्या कमिटी तयार करण्यात आल्या. ही कमिटी प्रत्येक तालुक्यात निविदा बहिष्कारासाठी देखरेख करेल. कमिटीमध्ये सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्थांचे लघू कंत्राटदार, पेठी कंत्राटदार, नोंदणीकृत कंत्राटदार, हॉटमिक्स प्लाँट असणारे कंत्राटदार आदी सर्व वर्गातील कंत्राटदारांचा समावेश आहे.
सदर बैठकीत दीपक कदम, बंटी मिश्रा, भोजराज येडे, सुशील गडपल्लीवार, परेश उजवणे, पिंटू जैन, असलम गोडील, बब्बी उके, रवी भरणे, सरफराज गोडील, दिनेश कोडवाणी, अनिल रहांगडाले, संतोष भेलावे, आनंद ठाकूर, सुशील मेश्राम, प्रकाश रामचंदानी, अशोक लांजेवार, ओमेश्वर कापगते, राजकुमार बरबटे, शैलेंद्र साखरे, अजय पांडे, प्रमोद संगीडवार, नंदू नागपुरे, प्रशांत रहांगडाले, राजीव शेडके, संजय जायस्वाल, नवीन उके, अरशद कुरेशी, अनूप कटरे, पंकज मिश्रा आदी सर्व कंत्राटदार उपस्थित होते.
तालुकानिहाय कार्यकारिणी
गोंदिया तालुका : असलम गोडील, दीपक कदम, दिनेश कोडवानी; गोंदिया शहर : अनिल रहांगडाले, आनंद जैन, सचिन मिश्रा; अर्जुनी-मोरगाव : परेश उजवणे, शैलेश जायस्वाल, नवीन उके, हेमराज पुस्तोडे, उद्धव मेहंदडे; सडक-अर्जुनी : अशोक लांजेवार, ओमेश्वर कापगते, रूपेश वर्मा, मुन्ना ठाकरे, सुमीत अग्रवाल, तिलक लंजे; गोरेगाव : अनूप कटरे, लक्ष्मीकांत बारेवार, अरविंद जायस्वाल, सचिन पटले, राजकुमार पारधी; देवरी : विजय अग्रवाल, सी.के. बिसेन, अजय पांडे, संदीप मोहबिया, जगपाल वैद्य, प्रीतमसिंग भाटिया; आमगाव : आनंद ठाकूर, मन्नू उजवणे, सुरेश लिल्हारे, संतोष भेलावे, लालू पांडे, सतिश आकांत, तुलेंद्र कटरे; सालेकसा : दर्शन जैन, सचिन बहेकार, मन्नू उजवणे, हिरालाल साठवणे, विक्की भाटिया; तिरोडा : महेंद्र बघेले, सतिश बचवानी, प्रकाश ज्ञानचंदानी, सुनील पालांदूरकर, सुखदान घानीवाल, उमा हारोडे व राजू बरबटे यांचा समावेश आहे.