बोअरवेल, विहिरीत पाण्याचा ठणठणाट

By Admin | Updated: May 29, 2015 01:23 IST2015-05-29T01:23:31+5:302015-05-29T01:23:31+5:30

ग्रामपंचायत पाऊलदौनाअंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

Bowerwell, water well in the well | बोअरवेल, विहिरीत पाण्याचा ठणठणाट

बोअरवेल, विहिरीत पाण्याचा ठणठणाट

बाघडोंगरीत पाण्यासाठी मरमर : ड्रमने पाणी नेऊन भागविली जाते गरज
आमगाव : ग्रामपंचायत पाऊलदौनाअंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील बोअरवेल, विहिर कोरड्या पडल्या आहेत. तलावातील पाणी बैलबंडीने ड्रामद्वारे आणले जात आहे.
अनेक वर्षांपासून बाघडोंगरीत पिण्याच्या व घरगुती वापराकरिता पाणी ही मोठी गंभीर समस्या आहे. या गावात गोंड समाज जास्त आहे. ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत बाघडोंगरी, पिपरटोला, बाघाटोला, जांभुळटोला यांना मोठी नळ योजना अंत्यत गरजेची आहे. गावातील शेतीला ओवारा प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे गावातील तलावात येऊ शकतो. मात्र प्रशासनाच्या हलगर्जी व दुर्लक्षित पणामुळे हा गाव सतत शेतीला मिळणारे पाणी यापासून वंचित राहतो. जर ओवारा प्रकल्पाचे पाणी सोनेखारणीजवळील कालव्याद्वारे बाघडोंगरी तलावात सोडले तर शेती उत्पन्न समाधानकारक होईल. तसेच उन्हाळ्यात विहिर व बोअरवेल यांच्यात जलस्तर वाढून पाणी समस्या राहणार नाही. अंजोरा गावाजवळून कालव्याद्वारे पाणी बाघडोंगरी गावाला दिल्या जाऊ शकते.
स्थानिक जनप्रतिनिधी यांनी प्रयत्न केले तर पाणी समस्या मिटू शकते, अशी प्रतिक्रिया उपसरपंच किशोर बोळणे यांनी व्यक्त केले. बाघडोंगरीत घरगुती कामाकरिता व पिण्याकरिता बैलबंडीने ड्रामद्वारे पाणी नेणारे शेतकरी बारीकराम कुंभरे यांनी याबाबत बोलताना ही पाणी समस्या ही मोठी गंभीर समस्या असून त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bowerwell, water well in the well