बँकेत शिल्लक रक्कम असूनही धनादेश बाऊंस ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST2021-07-30T04:31:06+5:302021-07-30T04:31:06+5:30

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा अजब कारभार समोर आला. खात्यात रक्कम शिल्लक असूनही चेक ...

Bounce check despite bank balance () | बँकेत शिल्लक रक्कम असूनही धनादेश बाऊंस ()

बँकेत शिल्लक रक्कम असूनही धनादेश बाऊंस ()

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा अजब कारभार समोर आला. खात्यात रक्कम शिल्लक असूनही चेक बाऊंस झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकारामुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला.

येथील शम्मी क्लाथ स्टोअर्सच्या नावे महाराष्ट्र बँकेत खाते आहे. स्टोअर्सच्या मालकांनी खात्यात रक्कम शिल्लक असल्याने दहा हजार रुपयाचा चेक दिला होता. पण तो चेक बाऊंस झाला. त्यामुळे त्यांनी बँकेत विचारणा केली मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. चेक पोष्टाद्वारे येईल असे सांगण्यात आले. तसेच या खात्यातून मागील २० जुलैपासून या-ना त्या कारणाने कधी ३८० रुपये, तर ४० रुपये तर कधी ४२ रुपये डेबीट होत आहेत. तेव्हा हे डेबीट होणारे रुपये कोणत्या कारणाने होत आहेत. याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा बँकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे संबंधित खातेधारकाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने येथील नागरिकांनी बँकेच्या विरोधात संताप व्यक्त केला. राष्ट्रीयकृत बँक असल्याने अधिकारी लक्ष देत नाही. कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना भिती वाटत नाही. एखाद्या ग्राहकाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई कोणी करावी? असा प्रश्न खातेधारकांपुढे निर्माण झाला आहे. पीक कर्ज घेण्यास शेतकऱ्यांना वारंवार बँकेच्या चकरा माराव्या लागतात. बरेच शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

................

कोट

शम्मी क्लाॅथ स्टोअर्सचे बँक खाते हे सीसीसी अकाऊंट आहे. त्यामुळे जेवढ्या वेळेस विड्राल केले जातील तेवढ्या वेळेस चार्जेस लागतील. धनादेश बाऊंस झाल्याची नोंद संगणकावर नसल्याने नेमका कशामुळे धनादेश बाऊंस झाला हे निश्चित सांगता येत नाही.

- व्ही.एम.लाेखंडे, सहाय्यक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र

Web Title: Bounce check despite bank balance ()