एकाच दिवशी दोघींची गळा आवळून हत्या

By Admin | Updated: May 26, 2015 01:51 IST2015-05-26T01:51:51+5:302015-05-26T01:51:51+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन एका इसमाने आपल्या पत्नीचा खून केला, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेवर प्रियकराने

Both of them were buried on the same day | एकाच दिवशी दोघींची गळा आवळून हत्या

एकाच दिवशी दोघींची गळा आवळून हत्या

संशयी पतीचे कृत्य : दुसरीला प्रियकरानेच बदनामीच्या भीतीने संपविले
गोंदिया :
चारित्र्यावर संशय घेऊन एका इसमाने आपल्या पत्नीचा खून केला, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेवर प्रियकराने बळजबरी करून नंतर तिने वाच्यता करू नये म्हणून तिचाही खून केल्याची घटना रविवारी घडली. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माल्ही येथील संजय रामदास गिऱ्हेपुंजे (२५) हा पत्नी पल्लवी (२४) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यात त्यांचे दोघांचे भांडण झाले. यात संजयने पल्लवीचा गळा आवळून तिला कायमचे संपविले. ही घटना रविवारच्या दुपारी २.३० वाजतादरम्यान घडली. गोरेगावच्या इंदिरानगरातील पवन धानू न्यायकरे (२२) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार येथील आहे. लता संजय टेंभूर्णे (३८) या विवाहितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला. शनिवारच्या रात्रीदरम्यान आरोपी दुर्गाप्रसाद गुलाबराव तुपटे (२८) रा.लक्ष्मीनगर, गौतमबुध्द वॉर्ड याने हे कृत्य केले. तिच्या नाकातून, तोंडातून रक्त वाहात होते. सदर महिलेची बहिण तुळसा राजेश दरवडे (३९) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर येथे राहणाऱ्या पतीशी लताचा घटस्फोट झाला होता. ती मागील १५ वर्षापासून आई-वडीलांकडे राहायला आली. बहिणीच्या आधाराने शेजारच्या घरी ती भाड्याने राहात होती. शनिवारच्या सायंकाळी ७ वाजताच्यादरम्यान घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी ती घराबाहेर पडली. मात्र ती घरी आलीच नाही. रविवारच्या सकाळी ७ वाजतादरम्यान पिंडकेपार रस्त्यावर तिचा मृतदेह आढळला.
दुर्गाप्रसाद व लता यांचे मागील अनेक दिवसांपासून संबंध होते, यातून ती त्याला पैश्याची मागणी करायची असे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या आधी त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर त्याला दुसरीकडे पैसे देण्यासाठी जायचे होते. उशीर होत असल्याचे सांगत त्याने जाण्याचा प्रयत्न केला तर तिने त्याला दिड हजार रूपये मला दे अन्यथा ही माहिती तुझ्या घरी देईल, अशी धमकी दिली. या धमकीमुळे तो संतापला व त्याने तिचा गळा आवळून खून केला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Both of them were buried on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.