लिफ्टमध्ये अडकले दोघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:57 IST2018-08-11T23:57:16+5:302018-08-11T23:57:35+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लिफ्टमध्ये दोन जण अडकल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान घडली. सुमारे ४५ मिनिटे दोघे लिफ्ट मध्ये अडकून राहिल्यानंतर त्यांना बाहेर काढता आले. यासाठी रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या घरात ठेवलेली लिफ्टची चाबी मागविण्यात आली.

लिफ्टमध्ये अडकले दोघे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लिफ्टमध्ये दोन जण अडकल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान घडली. सुमारे ४५ मिनिटे दोघे लिफ्ट मध्ये अडकून राहिल्यानंतर त्यांना बाहेर काढता आले. यासाठी रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या घरात ठेवलेली लिफ्टची चाबी मागविण्यात आली.
तालुक्यातील ग्राम कामठा निवासी संतोष गजभिये यांचे वडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती आहेत. त्यांना बघण्यासाठी संतोष व त्यांचा साथीदार शनिवारी (दि.११) आले होते. दुपारी २.१० वाजतादरम्यान दोघे लिफ्टने वरच्या माळ््यावर जात असताना अचानक वीज पुरवठा खंडीत झाला व दोघे आत अडकले. काही वेळाने वीज पुरवठा सुरू झाला. मात्र लिफ्टचे दार उघडले नाही व पुन्हा वीज पुरवठा खंडीत झाला. दरम्यान, महाविद्यालयातील लिपीक कटरे यांना घरून चाबी घेऊन बोलाविण्यात आले. त्यानंतर सुमारे ३ वाजतादरम्यान लिफ्टचे दार उघडून दोघांना बाहेर काढण्यात आले.