गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 00:22 IST2016-07-17T00:22:23+5:302016-07-17T00:22:23+5:30

प्रेमसंबंधातून गर्भवती राहिल्याने तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर दोन महिने संसार केला.

Both the abducted doctor and the two arrested | गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह दोघांना अटक

गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह दोघांना अटक

साकोली तालुक्यात : जांभळीच्या जंगलात केला गर्भपात
साकोली : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिल्याने तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर दोन महिने संसार केला. मात्र गर्भातील मुल माझे नाही, या संशयावरुन पत्नीला अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी भाग पाडले. यात महिलेचा मृत्यू झाला. गर्भपात साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथील जंगलात करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गर्भपात करणारा डॉ.चैतराम बघेले (४८) रा. खैरलांजी ता. साकोली व मनिषाचा पती राजु सावनलाल फुंडे (२५) रा. नवेगाव धुसाळा ता.मोहाडी या दोघांना अटक केली आहे.
राजु व मनिषा या दोघांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून मनिषा पाच महिन्याची गर्भवती राहिली. आपली बदनामी होईल या भितीपोटी राजु व मनिषा या दोघांनी ३० मे रोजी गोबरवाही येथे विवाह केला. व नागपूर येथे दोघेही संसार करु लागले. राजुचा संशय दिवसेंदिवस बळावत होता. त्यामुळे मनिषाच्या गर्भात वाढणारे मुल हे आपले नसुन दुसऱ्याचा कुणाचे तरी असावे असा संशय त्याला होता. त्यामुळे त्यांचे मनिषाला धमकी देऊन गर्भपात करण्यास बाध्य केले व मनिषाला त्यांच्याच सोबत संसार करायचे होते. त्यामुळे मनिषाही अवैध गर्भपात करण्यासाठी तयार झाली. ठरल्याप्रमाणे राजु व मनिषा ५ ला बसने नागपुरवरुन साकोली येथे आले. साकोलीला आल्यानंतर बोगस डॉक्टर बघेले याच्या दुचाकीवर तिघेही जांभळी सडक येथील जंगल शिवारात गुढरी तलावातील नहरात थांबले व तिथेच या बोगस डॉक्टरने मनिषाचे गर्भपात केले व गर्भपात केल्यानंतर डॉक्टरने दोघांनाही साकोली बसस्थानकावर सोडले. या दरम्यान मनिषाला रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे राजुने मनिषाला साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त असल्यामुळे साकोली येथील डॉक्टरांनी मनिषाला भंडारा येथे हलविले. उपचारादरम्यान मनिषाचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच मनिषाची आई तिरणबाई रहांगडाले रा. डोंगरी बुज. यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Both the abducted doctor and the two arrested