रोग प्रतिकारशक्ती वाढवा : डॉ. सुवर्णा हुबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST2021-04-08T04:29:10+5:302021-04-08T04:29:10+5:30

यावेळी डेडिकेटेड कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. जायस्वाल, लसीकरण अधिकारी विनय अवस्थी, दुर्गा ठाकरे, मेघा वासनिक, समुपदेशक अजीत ...

Boost Immunity: Dr. Suvarna Hubekar | रोग प्रतिकारशक्ती वाढवा : डॉ. सुवर्णा हुबेकर

रोग प्रतिकारशक्ती वाढवा : डॉ. सुवर्णा हुबेकर

यावेळी डेडिकेटेड कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. जायस्वाल, लसीकरण अधिकारी विनय अवस्थी, दुर्गा ठाकरे, मेघा वासनिक, समुपदेशक अजीत सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने फक्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे समुपदेशक फुले यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट वेगात पसरत आहे. प्रतिबंध हाच उपचार आहे. कोविड बाबत समाजात जनजागृती करणे व रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हेच उपाय आहेत. दररोज व्यायाम करा, संतुलित आहाराचे सेवन करा ताजी फळे खा, जीवनसत्व क युक्त पदार्थाचे सेवन करा लहान मुलांची काळजी घ्या, मास्क बांधा सतत हात साबणाने धुवा व बाह्य संपर्क टाळा कोविड अनुरुप योग्य वर्तनाची प्रत्येकाची जबाबदारी करु या. स्वत:च्या संरक्षणाबरोबरच इतरांचे सुध्दा कोविड या महामारीपासून संरक्षण करु या. यावेळी विनय अवस्थी यांच्या नेतृत्वात आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांनी निरोगी महाराष्ट्र निरोगी गोंदिया या प्रतिज्ञेचा संकल्प सर्वांना दिला. लोकसहभागातून आरोग्य शिक्षण देऊन आपण कोरोना महामारीवर विजय मिळवून एक सुंदर आरोग्यदायी जगाची निर्मिती करु या असा संकल्प निवासी वैद्यकीय डाॅ. हुबेकर यांनी दिला.

Web Title: Boost Immunity: Dr. Suvarna Hubekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.