बाेनस, चुकाऱ्याची रक्कम त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST2021-07-31T04:28:48+5:302021-07-31T04:28:48+5:30

तिरोडा : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बोनस आणि रब्बीतील धानाचे चुकारे अद्यापही मिळाले ...

Bonus, pay the amount immediately | बाेनस, चुकाऱ्याची रक्कम त्वरित द्या

बाेनस, चुकाऱ्याची रक्कम त्वरित द्या

तिरोडा : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बोनस आणि रब्बीतील धानाचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभाव मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. शासनाने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र, यापैकी बोनसची अर्धीच रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली, तर रब्बी हंगामात धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही चुकारे देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे आठ दिवसांत बोनस आणि चुकारे न दिल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांनी दिला आहे.

..........

Web Title: Bonus, pay the amount immediately