३१ तासांच्या मोहिमेनंतर मिळाला युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:43+5:30

अरविंदची मोटारसायकल काही अंतरावर सापडली. मात्र अरविंदचा शोध लागला नव्हता. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र यानंतरही अरविंदचा शोध न लागल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ही मोहीम राबवून ती नंतर थांबविण्यात आली. काही भागात पावसाचा जोर कायम असल्याने नाल्याच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती.

The body of the youth was found after a 31-hour operation | ३१ तासांच्या मोहिमेनंतर मिळाला युवकाचा मृतदेह

३१ तासांच्या मोहिमेनंतर मिळाला युवकाचा मृतदेह

Next
ठळक मुद्देचिचगड निलज येथील घटना : तीन दिवसानंतर लागला शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील निलज नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने तीन दिवस ३१ तास शोध मोहीम राबविल्यानंतर बुधवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता त्या युवकाचा मृतदेह सापडला.
तालुक्यातील खामखुर्रा मार्गावर असलेल्या निलज नाल्यावरील पुलावरुन पाणी जात असताना रविवारी (दि.९) रात्रीच्या वेळेस अरविंद पंढरी शहारे (३५) व संजय पांडे दोघेही रा. चिचगड पुलावरुन गाडी नेण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान पाण्याच्या प्रवाहात अरविंद मोटारसायकलसह वाहून गेला होता. तर संजय झाडाला लटकल्याने तो यातून बचावला होता. मात्र ४८ तासांचा कालावधी लोटूनही अरविंदचा शोध लागलेला नव्हता. सोमवारी गोंदिया येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने निलज नाल्यात शोध मोहीम राबविली. यात अरविंदची मोटारसायकल काही अंतरावर सापडली. मात्र अरविंदचा शोध लागला नव्हता. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र यानंतरही अरविंदचा शोध न लागल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ही मोहीम राबवून ती नंतर थांबविण्यात आली. काही भागात पावसाचा जोर कायम असल्याने नाल्याच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला शोध मोहीम राबविताना अडचण जात होती. परिणामी बुधवारी (दि.१२) सकाळी ६ वाजपासून पुन्हा निलज नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. दरम्यान निलज नाल्यापासून चार किमी अंतरावर अरविंदचा मृतदेह आढळला. अरविंद शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने तब्बल ३१ तास शोध मोहीम राबविली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने या मोहीमेत अडचण येत होती. बुधवारी या शोध मोहीमेला यश आले.
या मोहीमेत पोलीस हवालदार किशोर टेंभुर्णे, अजय खोब्रागडे, पोलीस शिपाई नरेश उईके, जसवंत रहांगडाले, संदीप कराडे, धीरज दुबे, दीनू दीप, इम्रान सैयद, रवी भांडारकर, जावेद पठाण व होमगार्ड इंद्रकुमार बिसेन, चुनीलाल मुटकुरे, गिरीधारी फतेह, जबराम चिखलोंडे, चिंतामन गिºहेपुंजे यांचा सहभाग होता.

Web Title: The body of the youth was found after a 31-hour operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.