कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: July 4, 2016 01:23 IST2016-07-04T01:23:12+5:302016-07-04T01:23:12+5:30

देवरी तालुक्याच्या जांभुळदंड जंगलात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी आढळला.

The body of the woman found in a rotten condition | कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

गोंदिया : देवरी तालुक्याच्या जांभुळदंड जंगलात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी आढळला. नागपूर ते रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भर्रेगावपासून काही दूर अंतरावर असलेल्या जांभुळदंड येथील जंगलात राष्ट्रीय महामार्गापासून श्ांभर मीटर अंतरावर २४ वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. तिच्यावर अत्याचार करुन खून केल्यानंतर मृतदेह ओळख पटू नये म्हणून टाकण्यात तर आला नाही ना? अशी शंका येते. भर्रेगाव येथील पोलिस पाटील संध्या विश्वनाथ बहेकार यांच्या तक्रारीवरुन देवरी पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी मृतक मुलीची वय अंदाजे ४० वर्ष टाकली आहे. परंतु प्रत्यक्षदर्शी मृतदेह पाहणाऱ्यांना तीचे वय ४० वर्षे नव्हे तर २४ वर्षे वाटत आहे.

Web Title: The body of the woman found in a rotten condition