‘त्या’ मृतदेहाची ओळख पटलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST2021-05-11T04:30:20+5:302021-05-11T04:30:20+5:30

दीड वर्षापूर्वी खैरी (सुकडी) जंगल शिवारात एका अज्ञात व्यक्तीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत ७ नोव्हेंबर २०१९ रोजी गुराख्याला आढळले होते. ...

The body was not identified | ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटलीच नाही

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटलीच नाही

दीड वर्षापूर्वी खैरी (सुकडी) जंगल शिवारात एका अज्ञात व्यक्तीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत ७ नोव्हेंबर २०१९ रोजी गुराख्याला आढळले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव तोदले, सपोनि प्रशांत भूते, अन्य सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले होते. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पंचनामा केला. मृतदेह पूर्णतः कुजलेले असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. पुरेशा साधना अभावी मृतकाचे वय ठरविणे शक्य नसल्याने त्याच क्षणी गोंदियाचे वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हलविण्यात आले होते. घटनेचा तपास सुकर व्हावा म्हणून त्यावेळी श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. मृतदेह ओळख पटण्यासाठी वेळोवेळी पोलीस विभागामार्फत आवाहन सुद्धा करण्यात आले होते. परंतु सदर मृतदेहाची ओळख पटली नाही.

Web Title: The body was not identified