रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात अनोळखी इसमाचा मृतदेह
By Admin | Updated: August 29, 2015 01:50 IST2015-08-29T01:50:38+5:302015-08-29T01:50:38+5:30
दाभना ते सुकडी फाट्यादरम्यान असलेल्या रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात साचलेल्या पाण्यात ...

रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात अनोळखी इसमाचा मृतदेह
अर्जुनी मोरगाव : दाभना ते सुकडी फाट्यादरम्यान असलेल्या रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात साचलेल्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह २ ते ३ दिवसांपासून पडला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी या बोगद्यात एका इसमाचा मृतदेह सापडला. दुपारी तो पाण्याबाहेर काढून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उत्तरीत तपासणीसाठी पाठविण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर मृताची ओळख पटलेली नव्हती. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, उपनिरीक्षक साळुंके यांनी घटनास्थळाला भेट दिली.
दाभना ते सुकळी फाट्यादरम्यानच्या रस्त्यावर रेल्वेने भूमिगत बोगदा तयार केला. रेल्वे जात असताना अपघात घडू नये यासाठी नागरिकांची सोय म्हणून हा भूमिगत बोगदा तयार केला आहे. या बोगद्यातील खोलगट भागात मुख्यत्वे पावसाळ्यात पाणी साचलेले असते. अशात या बोगद्यातून जाणे-येणे करणे शक्य होत नाही.
रात्रीच्या वेळी सुद्धा याठिकाणी अंधार असतो. बोगद्यात साचलेले पाणी काढण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला पंप लावावा लागतो. पावसाळ्याच्या चार महिन्यात बोगद्यातून वाहतूक बंदच असते. त्यामुळे हे बोगदे कुचकामी ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)