सामाजिक दायित्व जोपासणारे मंडळ

By Admin | Updated: September 24, 2015 02:17 IST2015-09-24T02:17:00+5:302015-09-24T02:17:00+5:30

सामाजिक व धार्मिक दायीत्व जोपासत पर्यावरण व समाज जागृतीसाठी तत्पर राहून फक्त उत्सवाच्या काळातच नव्हे तर बाराही महिने गरजूंच्या मदतीसाठी धावून ..

Board responsible for social responsibility | सामाजिक दायित्व जोपासणारे मंडळ

सामाजिक दायित्व जोपासणारे मंडळ

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिली मदत : रक्तदान, पर्यावरणासह सामाजिक जागृतीसाठी तत्पर
गोंदिया : सामाजिक व धार्मिक दायीत्व जोपासत पर्यावरण व समाज जागृतीसाठी तत्पर राहून फक्त उत्सवाच्या काळातच नव्हे तर बाराही महिने गरजूंच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा येथील श्री अपना गणेश उत्सव मंडळ जोपासत आहे. शहरातील काही तरूण एकत्र येवून येथील सिव्हील लाईन्स परिसरात मागील ११ वर्षांपासून उत्सव साजरा करीत आहेत.
येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौक परिसरात असलेल्या महिला मंडळाच्या मैदानावर मागील ११ वर्षांपासून श्री अपना गणेश उत्सव मंडळ उत्सव गणरायांची स्थापना करीत आहेत. तरूणांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली असून त्यांच्या या उत्सवाची भव्यता वाखाणण्याजोगी आहे. या मंडळाकडून सुमारे पाच वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तपेढीला मोठ्या संख्येत रक्त पुरविले आहे. याशिवाय बेटी बचाओ अभियानात सहभाग घेत उत्सवाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे. तर पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृतीचे कार्यक्रम घेतले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्यांची शिवाय गणपतीच्या आकर्षक मुर्ती व डेकोरेशनच्या आधारावर मंडळाने पोलीस विभागाकडून दिला जाणारा पुरस्कारही पटकाविला आहे.
या मंडळाचे संयोजक पंकज रहांगडाले असून अध्यक्ष अरविंद तिवारी, सचिव अमोल वासनीक, कोषाध्यक्ष अभय अशोक अग्रवाल व सदस्य बंटी शर्मा, मोहन लिल्हारे, विवेक बजाज, अमित अवस्थी व अन्य तरूणांचा समावेश आहे. सामाजिक दायीत्वांचा निर्वाह करून उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करणे. तसेच सर्वांना संघटीत करून हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी उत्सव साजरा करीत असल्याचे मंडळाचे संयोजक पंकज रहांगडाले यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Board responsible for social responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.