जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर

By Admin | Updated: July 1, 2015 02:17 IST2015-07-01T02:17:51+5:302015-07-01T02:17:51+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याचे माजी मंत्री आणि लोकमत समुहाचे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्जा ...

Blood donation camp on Thursday for Jawaharlal Darda Jayanti | जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर

जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर

लोकमत’चा उपक्रम : रक्तदान करून सामाजिक दायित्व निभवा
गोंदिया : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याचे माजी मंत्री आणि लोकमत समुहाचे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्जा यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (दि.२) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गोंदिया पब्लिक शाळा, पांगोळी नदी रोड, गोंदिया येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला गंगाबाई रक्तपेढीच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, कार्ड ेदेऊन अतिथींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नेहमीच रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे गरजूंना रक्तासाठी मोठीच धावपळ करावी लागते. ही उणीव दूर करण्याचे उद्देश्य समोर ठेवून लोकमत समूह व बाई गंगाबाई रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे. सदर उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांसह लोकमतचे वाचक, सामाजिक संघटना व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय (०७१८२-२३०५०७), (९८८१०११८२१), (९८२३१८२३६७), (९४२३६८९६६४) येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
रक्तदान का करावे ?
मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नाही. ते कृत्रिमरीत्या बनविता येत नाही. रक्त अधिक काळ टिकवून ठेवता येत नाही.
रक्तपेढीत रक्ताची सतत कमतरता असते. त्यामुळे रक्तदान नियमित करावे.
तुमच्याद्वारे दिलेले रक्त कोणत्याही व्यक्तीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी, मातेच्या प्रसूतीच्या वेळी व दुखापतीमुळे अधिक रक्तस्त्राव झाल्याने रक्ताची कमतरता पूर्ण करून त्याचे जीव वाचवू शकते.
रक्तावर ज्यांचे आयुष्य अवलंबून असते, असे सिकलसेल, थॅलेसॅमिया, हिमोफिलिया, अपॅल्स्टीक अ‍ॅनिमिया, रक्ताचे कर्करोग आदी रूग्णांना रक्तामुळे नवसंजीवनी मिळते.
रक्ताची आवश्यकता कधी कोणाला आणि कोठे पडेल याची शाश्वती कुणी देऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ऐच्छिक रक्तदान होणे गरजेचे आहे.
रक्तदान कोण करू शकतो?
१८ ते ४८ वर्षे वयोगटातील व वजन ५० किलोपेक्षा अधिक असलेली कोणतीही निरोगी व्यक्ती स्त्री-पुरूष स्वेच्छेने रक्तदान करू शकतात. साधारणत: निरोगी युवकांनी दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान केले तर रक्त निर्मितीला चांगली चालना मिळते.
रक्तदान किती प्रमाणात?
कोणत्याही शारीरिक हानीशिवाय एक व्यक्ती एका वेळी ३५० सीसी किंवा ४५० सीसी रक्तदान करू शकतो. दान केलेले रक्त आपले शरीर २४ तासात नैसर्गिकरित्या भरून काढते.
रक्तदान सुरक्षित आहे का?
होय, रक्तदान सुरक्षित, वेदनारहित व आनंदी असते. तसेच संपूर्णपणे सुरक्षित असते. रक्तदान केल्याने कोणताही त्रास होत नाही.
रक्तदानासाठी किती वेळ लागतो?
साधारणपणे रक्तदानाला १० ते १५ मिनिटे लागतात. यामध्ये रक्तदात्याचे वजन, हिमोग्लोबिन, रक्तदाब तपासणी आदी बाबींची वैद्यकीय तपासणी मोफत करण्यात येते. वास्तविक रक्तदानाची प्रक्रिया केवळ काही मिनिटातच पूर्ण होते.
रक्तदान किती वेळा करता येते?
एक व्यक्ती दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतो. याचाच अर्थ म्हणजे आपण वर्षातून चार वेळा रक्तदान करू शकतो.
रक्तदान कुठे केले जाऊ शकते?
कुठल्याही मान्यताप्राप्त रक्तपेढीत, शासकीय रूग्णालयात किंवा रक्तदान समितीने आयोजित केलेल्या ऐच्छिक रक्तदान शिबिरात आपण रक्तदान करू शकतो.

Web Title: Blood donation camp on Thursday for Jawaharlal Darda Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.