बीएलओ यांना मानधन मिळणार

By Admin | Updated: March 26, 2015 01:15 IST2015-03-26T01:15:43+5:302015-03-26T01:15:43+5:30

गोंदिया तालुक्यात मतदार यादी तयार करणे, मतदार छायाचित्र व मतदार स्लिप वितरण करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना बुथ लेवल आॅफिसरची (बीएलओ) ...

BLO will get honorarium | बीएलओ यांना मानधन मिळणार

बीएलओ यांना मानधन मिळणार

गोंदिया : गोंदिया तालुक्यात मतदार यादी तयार करणे, मतदार छायाचित्र व मतदार स्लिप वितरण करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना बुथ लेवल आॅफिसरची (बीएलओ) कामे देण्यात आली होती. मात्र त्यांना कामाचा मोबदला देण्यात आला नव्हता. मात्र आता हा मोबदला मिळविण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत आहे.
सदर मोबदला मिळविण्यासाठी गोंदिया तालुका समितीचे कार्याध्यक्ष सुरेश रहांगडाले व तालुकाध्यक्ष वरूण दीप यांच्या नेतृत्त्वात बीएलओच्या कामाशी संबंधित तालुका कार्यालयातील अधिकारी दिलीप आर. कटरे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावर सर्व बीएलओ यांना येत्या दोन-तीन दिवसांत संबंधितांच्या बँक खात्यात प्रति बीएलओ पाच हजार ०७५ रूपये जमा करण्यात येतील, असे सांगण्यात आले. तसेच काही बीएलओ यांनी अद्याप खाते क्रमांक दिले नाही. त्यांनी आपले खाते क्रमांक संबंधित कर्मचाऱ्याकडे जमा करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
याप्रसंगी पी.बी. सर्याम, पी.एन. पटले, दिनेश रहांगडाले, आर.जी. मेश्राम, जी.एम. बांते, अनुप नागपुरे, अजय कावळे, दिलीप नवखरे, एन.एन. बिसेन, राजू रहांगडाले, राजेंद्र डहाके, पी.डी. चव्हाण, बी.एल. मटानी, गणेश चव्हाण, मनिष मेश्राम, सुधाकर चोरनेले, हेमंत कावळे, आनंद जांभूळकर, छगन कावरे, शिवचंद गौतम, सुरेश चोरनेले, हेमकृष्ण टेंभुर्णे, जी.टी. रहांगडाले, लोकचंद बावणकर, आय.एल. पटले, एस.आर. नागपुरे, सी.टी. ठकरेले, वाय.सी. वासनिक, एम.बी. बघेले, पुष्पा तुरकर, सरला नायडू, अफरोजा खान, अनिता जॉन, छाया कोसरकर, राजू फरकुंडे, एस.डी. भावे, संजय पराडकर, विजयलता पोहरकर आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रस्त्यांचे बेहाल
मुंडीकोटा : वैनगंगा नदीच्या काठावर माता मंदीर व डोंगाघाट यांचा लिलाव करण्यात आला. परंतु हा रस्ते खराब असल्याने वाहनांचा प्रश्न पुढे आहे.

Web Title: BLO will get honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.