काम करणाऱ्या लोक प्रतिनिधींना आशीर्वाद द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:14 IST2018-11-10T21:14:13+5:302018-11-10T21:14:34+5:30
ग्राम सिवनीसोबत माझ्या लहानपणाच्या आठवणी जुळल्या असून गावकºयांसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र निवडणुकीत गावकऱ्यांचे प्रेम कमी प्रमाणात मिळत असल्याचे दु:ख आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून पुढे आमचे प्रयत्न सुरू राहतील.

काम करणाऱ्या लोक प्रतिनिधींना आशीर्वाद द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्राम सिवनीसोबत माझ्या लहानपणाच्या आठवणी जुळल्या असून गावकऱ्यांसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र निवडणुकीत गावकऱ्यांचे प्रेम कमी प्रमाणात मिळत असल्याचे दु:ख आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून पुढे आमचे प्रयत्न सुरू राहतील. मात्र गावकऱ्यांनीही काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आशीर्वाद द्यावा, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम सिवनी येथे १२ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्रामपंचायत भवन, ३ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता व १.५० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर बौद्ध विहार चावडी बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी गावातील प्रमुख कॉँग्रेस कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य राजु गौतम यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नातूनच गावात १७ लाख रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होत असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, सरपंच धुर्वराज उके, रूक्समा गौतम, रूद्रसेन खांडेकर, प्रमिला करचाल, विद्या भालाधरे, पवनलाल गौतम, अनिता शरणागत, महेश गोंडाणे, कैलाश ठाकरे, योगेश गौतम, देवलाल रहांगडाले, अरूण चव्हाण, सुकदेव उके, हिरालाल मरसकोल्हे, लोकेश तुरकर, व्यंकटराव कारे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.