शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात नळातून काळे पाणी

By admin | Updated: November 6, 2014 22:57 IST

कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन महिन्यांपासून नळांद्वारे काळ्या रंगाचे दूषित पाणी निघत आहे. या प्रकाराची माहिती रूग्णालय प्रशासनाला देण्यात आली, परंतु ही समस्या दूर झालेली नाही.

गोंदिया : कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन महिन्यांपासून नळांद्वारे काळ्या रंगाचे दूषित पाणी निघत आहे. या प्रकाराची माहिती रूग्णालय प्रशासनाला देण्यात आली, परंतु ही समस्या दूर झालेली नाही. प्रामुख्याने जिथे जिल्हा शल्य चिकित्सकांचे कार्यालय आहे, त्याच भवनाच्या मागील बाजूला नळ लागलेला आहे. तेथून दूषित पाणी निघत आहे. या नळाचे पाणी रूग्णालय परिसरातील एका टाकीत जमा होते व नंतर ते पाणी रूग्णालयात सर्वत्र वितरित होते. याच पाण्याचा उपयोग करून रुग्णालयातील भोजन तयार केले जाते. रूग्ण व त्यांचे कुटुंबीय याच पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. या प्रकारामुळे त्या रूग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ज्या ठिकाणी नळ लागलेला आहे व पाण्याची टाकी आहे, तिथे जवळच रूग्णालयात कार्यरत काही कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर आहेत. येथे उपस्थित महिलांनी सांगितले की, ते या पाण्याचा उपयोग करीत नाही. परंतु जवळच एक विहीर आहे. त्या तिथून पाणी आणतात. सदर नळ नगर परिषदेच्या वतीने लावण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या पाणी पुरवठा विभागाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे गोंदिया नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा इथे पुन्हा एकदा प्रत्यय येत आहे.महिला आपल्या कुटुंबांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या पाण्याचा उपयोग करीत नसल्या तरी जे लोक बाहेरून उपचारासाठी येतात त्यांचे नातेवाईक नवीन संक्रामक आजार तर आपल्या बरोबर घेवून जात नाही ना? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)