राष्ट्रपतीपदी कोविंद यांच्या विजयावर भाजपाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:50 IST2017-07-22T00:50:25+5:302017-07-22T00:50:25+5:30
भारताच्या १४ व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रामनाथ कोविंद यांचा विजय झाल्यावर

राष्ट्रपतीपदी कोविंद यांच्या विजयावर भाजपाचा जल्लोष
आतशबाजी करून मिठाई वितरण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारताच्या १४ व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रामनाथ कोविंद यांचा विजय झाल्यावर गुरूवारी २० जुलै रोजी भाजपातर्फे विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
अनुसूचित जाती मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष रतन वासनिक यांच्या नेतृत्वात आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी आतशबाजी केली व मिठाई वाटून आनंद साजरा केला.
याप्रसंगी प्रामुख्याने भाजपाचे जिल्हा महामंत्री भाऊराव उके, संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा प्रचार-प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा महामंत्री अजित मेश्राम, शहर महामंत्री चंद्रभान तरोणे, धनंजय वैद्य, शालिनी डोंगरे, श्याम चौरे, मोहन गौतम, कुंदा भास्कर, अशोक चन्ने, आशा जैन, अक्षय वासनिक, बी.एस. रामटेके, देवेंद्र टेंभरे, युनुस पटेल, स्वरूप रामटेके, रिषभ लिल्हारे, स्वयंम चव्हाण आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.