भाजपचे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन बुधवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST2021-02-23T04:44:59+5:302021-02-23T04:44:59+5:30
१०० युनिटपर्यंत वीज मोफत द्या, भरमसाट पाठविलेले घरगुती व शेती वीज बिल दुरुस्त करा, कापलेले वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात ...

भाजपचे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन बुधवारी
१०० युनिटपर्यंत वीज मोफत द्या, भरमसाट पाठविलेले घरगुती व शेती वीज बिल दुरुस्त करा, कापलेले वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात यावे, जोपर्यंत शासन घरगुती व शेती वीज बिलात सवलत देत नाही किंवा माफ करीत नाही तोपर्यंत वीज कनेक्शन कापणे बंद करावे, धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे त्वरित देऊन बोनसची रक्कम त्यांच्या खात्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जमा करावी, रोजगार हमी योजनेची कामे लवकर सुरू करावी, शेतकऱ्यांची धान खरेदी मर्यादा १३ क्विंटलऐवजी २० क्विंटल करण्यात यावी, धडक सिंचन योजनेची शिल्लक रक्कम त्वरित देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भारतीय जनता पक्ष तिरोडा शहर व ग्रामीण यांनी कळविले आहे.