शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

भाजप जिल्हा कार्यालयात एकच जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:05 IST

जसजशी निकालाची उत्कंठा वाढत होती तसतसा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साही ओसंडून वाहत होता. पहिल्या फेरीपासूनच भाजप गोटात उत्साह दिसून आला. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.

ठळक मुद्देढोलताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी ! ग्रामीण भागातही गुलालाची उधळण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जसजशी निकालाची उत्कंठा वाढत होती तसतसा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साही ओसंडून वाहत होता. पहिल्या फेरीपासूनच भाजप गोटात उत्साह दिसून आला. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. फटाक्यांची आतषबाजी अन् ढोलताशांच्या गजरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. जवळपास ३२० कर्मचारी मतमोजणीसाठी येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या केंद्रात उपस्थित होते. शाळाबाहेरील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी सकाळीच बंद करण्यात आला होता. शास्त्री चौकातून वाहतूक व्यवस्था वळविण्यात आल्यानंतर शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना निकाल ऐकण्यासाठी दसरा मैदानात सोय करण्यात आली होती.विशेषत: पक्ष कार्यकर्त्यांची गर्दी मतमोजणी परिसरात होऊ नये याची काळजीही क्षणोक्षणी घेतली जात होती. पहिला फेरीचा निकाल जवळपास नऊ वाजता बाहेर कळताच भाजप कार्यकर्त्यांचे चेहेरे प्रफुल्लीत व्हायला सुरूवात झाली होती.जलाराम चौकातील सभागृहात एकत्रित आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी उमेदवार सुनील मेंढे हेही उ्स्थित होते. उपस्थितांनी सुनील मेंढे यांना पेढा भरवित घोषणा दिल्या. गुलालाची उध1ळण व हरातुऱ्यांनी मेंढे यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.अशीच स्थित राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात बघावयास मिळाली. सदर कार्यालय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनसंपर्क कार्यालय सुद्धा आहे.दुसरीकडे भंडारा शहरातील जलाराम सभागृहात सुनील मेंढे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशीवार, आमदार चरण वाघमारे, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, मेंढे यांच्या पत्नी शुभांगी मेंढे, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.असा वाढत गेला कार्यकर्त्यांचा उत्साहआमचा उमेदवार निवडून येणारच अशी ग्वाही देत कार्यकर्त्यांनी आनंदही व्यक्त केला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत होता. मात्र जोपर्यंत अंतिम निकाल हाती येत नाही, तोपर्यंत सर्वांनी निकाल घोषणेची वाट बघावी, असेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे रणरणत्या उन्हाच्या फटक्यानेही नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. सायंकाळी ५ वाजतानंतर मात्र शास्त्री चौकात चांगलीच गर्दी दिसून आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल