भाजपाविरुद्ध भाजपा आज निवडणूक रंगणार
By Admin | Updated: July 31, 2016 00:22 IST2016-07-31T00:22:29+5:302016-07-31T00:22:29+5:30
येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. गोठणगावची पंचवार्षिक निवडणूक ३१ जुलै २०१६ रोजी रविवारला होत आहे.

भाजपाविरुद्ध भाजपा आज निवडणूक रंगणार
गोठणगाव : येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. गोठणगावची पंचवार्षिक निवडणूक ३१ जुलै २०१६ रोजी रविवारला होत आहे. परंतु मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचे कारण पण बोलके आहे. एकीकडे शेतकरी विकास आघाडी ही जुन्या जाणत्या पक्षनिष्ठ भाजपा कार्यकर्त्यांची आहे, तर दुसरीकडे तालुका भाजपा महामंत्री भोजराज लोगडे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी परिवर्तन पॅनल रिंगणात आहे.
या निवडणुकीमध्ये भाजपाविरुद्ध भाजपा असे समिकरण दिसत आहे. यासंदर्भात लोकमत प्रतिनिधीने तालुका भा.ज.पा.चे महामंत्री लोगडे यांना विचारले असता ते म्हणाले, मी मोठा नाही, पण पक्ष मोठा आहे आणि आता तर काही लोक मी मोठा म्हणून स्वत:ला मिरवतात. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी २० वर्षे निवडणूक लढवली तरी आता पुन्हा आम्हीच हा त्यांचा अट्टाहास आहे. म्हणून मी नव्या जोमाने नवीन कार्यकर्त्यांसह एक गट तयार केल्याचे ते म्हणाले.