भाजपने जागा राखली

By Admin | Updated: May 31, 2016 01:43 IST2016-05-31T01:43:29+5:302016-05-31T01:43:29+5:30

शहरातील प्रभाग क्र मांक १ मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली जागा राखली. या

The BJP retains the position | भाजपने जागा राखली

भाजपने जागा राखली

गोंदिया : शहरातील प्रभाग क्र मांक १ मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली जागा राखली. या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजू विठ्ठलराव पारधी यांचा विजय झाला. तर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे उमेदवार लोकचंद रहांगडाले राहिले. या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १ ‘ड’ या सर्वसाधारण वर्गातील सदस्य अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या एकाच जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. पांडे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते त्यामुळे ही जागा भाजपकडे होती. आता रिक्त झालेली ही जागा परत मिळविण्यासाठी भाजपकडून चांगलीच मेहनत घेण्यात आली होती. तर ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांनीही चांगलाच जोर लावला होता.
रविवारी (दि.२९) यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात फक्त ३८. ८६ टक्के मतदान झाले होते. दरम्यान सोमवारी (दि.३०) येथील स्वर्ण जयंती कार्यालयात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी करण्यात आली. यात भाजपचे राजू पारधी यांनी १२९६ मते घेऊन विजय मिळविला. तर दुसऱ्या क्रमांकावर ११७६ मते घेऊन कॉंग्रेस उमेदवार लोकचंद रहांगडाले राहिले. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विनायक खैरे ११३१ मते घेऊन होते.
विशेष म्हणजे मतमोजणी केंद्रासमोर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळपासूनच हजर होते. पारधी यांचा विजय झाल्याची घोषणा होताच भाजपच्या गोटातून आनंद व्यक्त करीत फटाके फोडण्यात आले. कमी झालेली जागा पुन्हा परत मिळाल्याने भाजपच्या गोटात अत्यधीक आनंद दिसून आला. (शहर प्रतिनिधी)
१२० मतांचा फरक
४या पोटनिवडणुकीत प्रभागातील १३ हजार १६७ मतदारांना मतदानाचा हक्क बजवावयाचा होता. मात्र यातील फक्त ५११७ मतदारांनीच मतदान केले. परिणामी रिंगणात असलेल्या सहा उमेदवारांत मतांचे विभाजन झाले. त्यामुळे निवडून आलेले राजू पारधी तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लोकचंद रहांगडाले यांच्यात फक्त १२० मतांचाच फरक आहे.

Web Title: The BJP retains the position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.