शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

गोंदिया नगर परिषदेत ‘भाजपराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 00:54 IST

नगर परिषदेतील विषय समित्यांचे सभापतिपद काबीज करीत भारतीय जनता पक्षाने पालिकेवर आपली सत्ता स्थापित केली.

नवख्यांनाही दिली संधी : सभापतिपदी पानतावणे, कदम, गोपलानी, बिसेन व मेश्राम गोंदिया : नगर परिषदेतील विषय समित्यांचे सभापतिपद काबीज करीत भारतीय जनता पक्षाने पालिकेवर आपली सत्ता स्थापित केली. विषय समित्यांचे सर्व सभापतिपद भाजपने आपल्याकडे घेतले. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बांधकाम समिती सभापतिपदी गटनेता घनश्याम पानतावणे यांची वर्णी लागली. या निवडणुकीत जुन्यांसह नवख्यांनाही संधी देण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तटस्थ भूमिका निभावल्याचे दिसून आले. विषय समित्यांचे गठन, उपाध्यक्षांकडे कोणती समिती द्यावी व विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी शुक्रवारी (दि.१७) पालिकेने विशेष सभा बोलाविली होती. या सभेत सर्वप्रथम विषय समित्यांमध्ये किती सदस्य असावेत यावर चर्चा करण्यात आली. यावर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसने समितीत ११ सदस्य घेण्यावर सहमती दर्शविली. गोंदिया शहर परिवर्तन आघाडी व कॉंगे्रसच्या सदस्यांनी १२ सदस्य घेण्याची मागणी केली. त्यावर ११ सदस्यांना घेऊन २५ सदस्य व नगराध्यक्ष अशा २६ जणांनी आणि १२ सदस्यांवर १६ जणांनी हात उचावले. त्यानुसार विषय समित्यांत ११ सदस्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विषय समितीत भारतीय जनता पक्षाचे पाच, कॉंग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे दोन व गोंदिया शहर परिवर्तन आघाडीचे दोन अशा एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्षांकडे कोणती समिती देण्यात यावी यावर चर्चा करण्यात आली. यात उपाध्यक्षांना स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती देण्यात यावी असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर विषय समित्यांचे गठन करीत सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर तर सहकारी मुख्याधिकारी चंदन पाटील उपस्थित होते. लिपीक शिव हुकरे, मुकेश शर्मा, एस.एस.गायधने आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) तिरोडा न.प. सभापतीची निवड एकमताने १७ फेबु्रवारी रोजी शुक्रवारला नगर परिषद सभापतीची निवड झाली. यात बांधकाम सभापतीपदी अशोक असाटी (भाजप), शिक्षण सभापतीपदी नरेश कुंभारे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी श्वेता मानकर (भाजप) तर आरोग्य व स्वच्छता समिती उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर (शिवसेना) यांच्याकडे आली. सर्वानुमते ही निवड करण्यात आली हे विशेष. पिठासीन अधिकारी म्हणून सुनील सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, तथा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे व न.प.सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.