भाजपने दलालराज पूर्णपणे संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:08 IST2017-08-28T22:08:12+5:302017-08-28T22:08:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाणार नाही व खाऊ देणार नाही हे पूर्वीच सांगितले होते. त्याच धोरणावर राज्य व केंद्रातील भाजप सरकार चालत आहे.

भाजपने दलालराज पूर्णपणे संपविले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाणार नाही व खाऊ देणार नाही हे पूर्वीच सांगितले होते. त्याच धोरणावर राज्य व केंद्रातील भाजप सरकार चालत आहे. यामुळे खाण्याची इच्छा बाळगणाºया विरोधकांचा दाणापाणी बंद झाला आहे. यामुळे ते शेतकºयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करीत आहेत. मात्र सरकारने थेट शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा टाकण्याचा निर्णय घेऊन दलालराज पूर्णपणे संपविल्याचे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.
तालुक्यातील ग्राम तांडा येथील दुर्गा मंदिर चौकातील सभामंडप व सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव उके, संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, छत्रपाल तूरकर, मुनेश रहांगडाले, नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, अशोक जयसिंघानी, सुभाष मुंदडा, खेमन फुंडे, हसनसिंह सोमवंशी, इंद्रायणी रहांगडाले, कुंजन रहांगडाले उपस्थित होते.
याप्रसंगी अग्रवाल यांनी, सरकारने जनतेला सरपंच निवडण्याचा अधिकार दिला. मात्र विरोधी याचा विरोध करीत असून ते जनतेला अधिकारांपासून वंचीत ठेवू बघत असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्तावीक सरपंच इंद्रायणी रहांगडाले यांनी मांडले. संचालन करून आभार भारतीय जनता पक्षाचे तालुका महामंत्री मुनेश रहांगडाले यांनी मानले.