भाजपाने निव्वळ पोकळ आश्वासन दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:27 IST2018-10-15T21:27:31+5:302018-10-15T21:27:47+5:30

सत्तेत आल्यावर भाजपने केवळ घोषणा दिल्या, मात्र त्यांची पूर्तता केली नाही. गरिबांची छाती २६ इंचची करुन टाकली. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. एक लिटर पेट्रोलमागे सरकारला ३५ रुपये नफा मिळतो. हे ३५ रुपये सरकारच्या खात्यावर जमा होतात मग हे पैसे जातात कुठे. मग्रारोहयो अंतर्गत कुशल कामाचे पैसे मिळत नाही.

The BJP gave away empty hollow promises | भाजपाने निव्वळ पोकळ आश्वासन दिले

भाजपाने निव्वळ पोकळ आश्वासन दिले

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कार्यकर्ता मेळावा व बुथ कमिटी सदस्य बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : सत्तेत आल्यावर भाजपने केवळ घोषणा दिल्या, मात्र त्यांची पूर्तता केली नाही. गरिबांची छाती २६ इंचची करुन टाकली. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. एक लिटर पेट्रोलमागे सरकारला ३५ रुपये नफा मिळतो. हे ३५ रुपये सरकारच्या खात्यावर जमा होतात मग हे पैसे जातात कुठे. मग्रारोहयो अंतर्गत कुशल कामाचे पैसे मिळत नाही. गॅसचे दर वाढले आहे. जनधनचे खाते सर्वसामान्यांनी उघडले पण पुढे त्या खात्याचे काय झाले. गरीबांना रेशन मिळत नाही भाजप सरकार सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप खासदार प्रफुल पटेल यांनी केला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यकर्ता मेळावा बुथ कमेटी सदस्य बैठकीत रविवारी (दि. १४) ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पंचम बिसेन, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, प्रदेश समिती सदस्य मनोहर चंद्रीकापुरे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, राजलक्ष्मी तुरकर, डुमेश चौरागडे, केवलराम बघेले, सोमेश रहांगडाले, श्रीप्रकाश रहांगडाले, डॉ. संजय रहांगडाले, महेंद्र चौधरी उपस्थित होते.
पटेल म्हणाले, भेल कारखाना बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांना काम नाही. धापेवाडा टप्पा -२ चा विकास झाला नाही. अदानीची वीज महाराष्ट्राला २५ वर्षांसाठी अडीच रुपये प्रमाणे मिळणार होती. पण आता ती सामान्य ग्राहकांना सात-आठ रुपये युनिट दराने मिळत आहे. आता या सरकारने लोडशेंडीग सुरु केली आहे. सरकारचे अपयश आणि खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे कार्य कार्यकर्त्यानी करावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले. बुथ कमेटी तयार करा असे आवाहन करीत आपसात सौजन्याने वागण्याचे सल्ला त्यांनी दिला.
संचालन केवलराम बघेले यांनी केले तर आभार डॉ. श्रीप्रकाश रहांगडाले यांनी मानले.
कार्यक्रमासाठी लालचंद चव्हाण, प्रदीप जैन, महेंद्र चौधरी, बाबा बहेकार, कमलेश बारेवार, भूपेश गौतम, बाबा बोपचे, अशोक काठेवार, आदेश फुले, अनिता तुरकर, संतोष रहांगडाले, अशोक बघेले, हितेंद्र बिसेन, राजेश बिसेन, सतनाम राऊत, बबलू वंजारी, शाम बोपचे, तानु पटले, मंजू तिरेले, छाया उखरे, कल्पना शेवटे, सुशिला कटरे, शकुंतला टेंभेकर, ज्योती भावे, विमला येळणे यांनी सहकार्य केले.

Web Title: The BJP gave away empty hollow promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.