भाजपाच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST2021-06-03T04:21:01+5:302021-06-03T04:21:01+5:30

यावेळी जिल्हा भाजपा महासचिव लायकराम भेंडारकर, खरेदी विक्री समितीचे संचालक पंढरी लोगडे, तालुका भाजपा महासचिव रत्नाकर बोरकर, युन्नाथ मेश्राम, ...

BJP felicitates Corona Warriors | भाजपाच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार

भाजपाच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार

यावेळी जिल्हा भाजपा महासचिव लायकराम भेंडारकर, खरेदी विक्री समितीचे संचालक पंढरी लोगडे, तालुका भाजपा महासचिव रत्नाकर बोरकर, युन्नाथ मेश्राम, श्रीकांत वैद्य उपस्थित होते. आरोग्य विभागाचे समस्त कर्मचारी कोरोना चाचणी करून बाधितांवर औषधोपचार करतात. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शतप्रतिशत होण्यासाठी गावपातळीवर शिबिर घेऊन लस देण्याला प्राथमिकता देतात. देवदूत ठरलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, डॉ. कुंदन कुलसुंगे, आरोग्य सहाय्यिका मंदा नंदेश्वर, आरोग्य सेविका भुमाली उईके, प्रतिभा राऊत, स्वाती लोहारे, आरोग्य सेवक पवन साखरे, रवी दोनोडे, घनश्याम ऊरकुडे, निकिता रहिले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व संचालन रत्नाकर बोरकर यांनी केले. तर आभार डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी मानले.

Web Title: BJP felicitates Corona Warriors