भाजपात असंतुष्टांचा स्फोट

By Admin | Updated: January 31, 2015 23:21 IST2015-01-31T23:21:56+5:302015-01-31T23:21:56+5:30

भारतीय जनता पक्षात एकेकाळी सत्तेचे केंद्र ठरणाऱ्या आमगावात राजकीय भूकंप होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपातील शिवणकर गटाच्या असंतुष्ट बंडखोरांकडून त्यासाठी रविवारी

BJP dissatisfied | भाजपात असंतुष्टांचा स्फोट

भाजपात असंतुष्टांचा स्फोट

आज शक्तिप्रदर्शन : शिवणकर राकांकडून विधान परिषदेवर?
आमगाव : भारतीय जनता पक्षात एकेकाळी सत्तेचे केंद्र ठरणाऱ्या आमगावात राजकीय भूकंप होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपातील शिवणकर गटाच्या असंतुष्ट बंडखोरांकडून त्यासाठी रविवारी (दि.१) येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात शक्तिप्रदर्शन होणार आहे.
मागील एक दशकापासून चालत असलेली भाजपातील अंतर्गत वर्चस्वाची लढाई आता विकोपाला पोहोचली आहे. पक्षातील असंतुष्ट शिवणकर गट आता शक्तीप्रदर्शन करून भाजपातून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि विजय शिवणकरांना विधानस परिषदेवर घेतले जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
पूर्व विदर्भात भारतीय जनता पक्षात अनेक नेत्यांनी संघर्ष करीत पक्षबांधणीसाठी परिश्रम घेतले. आज पूर्व विदर्भ भाजपाचा गड म्हणून गाजत आहे. विरोधी व सत्तापक्षात नेत्यांनी आपल्या कामाचा दरारा निर्माण केला. परंतु पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व दिल्याने स्वत:च्या राजकारणाकरीता नेत्यांनी धावपळ सुरू केली. शिवणकरांनी जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. मात्र सत्ता हाती असतानाही त्यांना कुरघोडीच्या राजकारणाला तोंड द्यावे लागत आहे.
प्रा.महादेवराव शिवणकर व विजय शिवणकर यांच्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका बजावल्याच्या तक्रारी पुढे आहेत. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला शिवणकरांनी डावलल्याचे कारण पुढे करून दोन दिवसांपूर्वी झालेल्या आमगाव तालुका भाजपच्या बैठकीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आणि येथूनच असंतोषाची ठिणगी भडकली. यातून असंतुष्ट शिवणकर गटाने शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरविले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: BJP dissatisfied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.