गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक ग्रा.पं.वर भाजपचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 15:46 IST2021-01-19T15:44:06+5:302021-01-19T15:46:06+5:30
Gondia News गोंदिया तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित उमेदवार निवडून आले असून, भाजप समर्थित उमेदवारांचा सर्वाधिक विजय झाल्याचा दावा माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे.

गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक ग्रा.पं.वर भाजपचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित उमेदवार निवडून आले असून, भाजप समर्थित उमेदवारांचा सर्वाधिक विजय झाल्याचा दावा माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे.
सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात परसवाडा, छिपिया, कटंगटोला, बिरसोला, कासा, बलमाटोला, घिवारी, नवेगाव (पा.), सावरी, रावनवाडी, हिवरा, फुलचूर, बघोली, चंगेरा या ग्रामपंचायतीत माजी आमदार गोपालदास अग्रवाल समर्थित भाजप पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा दावा केला आहे. नागरा, गर्रा, पोवारीटोला येथेसुध्दा बऱ्यापैकी यश मिळाले आहे. गोंदिया तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या फुलचूरटोला आणि काटी ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार अग्रवाल समर्थित पॅनलचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फळ असून, याठी त्यांनी या सर्वांचे आभार मानले. तसेच खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखविल्याची प्रतिक्रिया माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली.