जन्मदात्रीची हत्या

By Admin | Updated: June 15, 2016 02:18 IST2016-06-15T02:18:55+5:302016-06-15T02:18:55+5:30

पती व पत्नीचा विकोपाला गेलेला वाद सोडविण्यासाठी त्यांच्यात मध्यस्थी करुन समजूत घालण्यासाठी पुढे आलेल्या आईच्या डोक्यावर पोटच्या मुलानेच वरवंट्याने मारून ...

Birthdate murder | जन्मदात्रीची हत्या

जन्मदात्रीची हत्या

कोकण्यातील घटना : मुलगा व सुनेच्या वादात मध्यस्थी भोवली
गोंदिया : पती व पत्नीचा विकोपाला गेलेला वाद सोडविण्यासाठी त्यांच्यात मध्यस्थी करुन समजूत घालण्यासाठी पुढे आलेल्या आईच्या डोक्यावर पोटच्या मुलानेच वरवंट्याने मारून तिची हत्या करण्याची घटना सडक अर्जुनी तालुक्याच्या कोकणा येथे सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. शेवंताबाई अंताराम सतिमेश्राम (६०) असे मृत महिलेचे नाव आहे. मुकुंद अंताराम सतिमेश्राम (३२) असे आरोपीचे मुलाचे नाव आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा येथील मुकुंदा अंताराम सतिमेश्राम (३२) हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसोबत नेहमीच भांडण करीत होता. १३ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास मुकुंदा व त्याची पत्नी उर्मिला या दोघांमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला जात असतानाचे पाहून मुकुंदाची आई त्या दोघांच्या वादात मध्यस्थी करण्याकरिता गेली. मात्र मुकुंदा रागाच्या भरात पत्नीला मारहाण करीत होता. त्यातच मध्ये पडलेल्या आईला मसाला वाटण्याच्या वरवंट्याने डोक्यावर वार केले. या घटनेत आई शेवंता क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कोकणा गावात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिस ठाण्यात करण्यात आली. आरोपी मुकुंदा सतिमेश्राम विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Birthdate murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.